जिद्द-स्वप्नपूर्ती-संयम-क्वारंटाईन-सेलिब्रेशन!एक कहानी पंढरपुरातील यशाची … मजूर दाम्पत्याच्या मुलाची इस्रोमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञपदी निवड


भारतातील दहा जणांची निवड झालेल्यांमध्ये महाराष्ट्रातून एकमेव .


आई-वडील आणि एक भाऊ दुसऱ्याच्या शेतात जाऊन मोल मजुरी करत असतानाही सरकोली (ता.पंढरपूर, जि. सोलापूर) येथील सोमनाथ नंदू माळी या युवकाची जिद्दीने शिक्षण घेत थेट इस्रो (ISRO) पर्यंत मजल. 


तिरुअनंतपुरम (केरळ) येथील ‘विक्रम साराभाई स्पेस सेंटर’ मध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ (Senior Scientist) म्हणून निवड .


विशेष प्रतिनिधी

पंढरपूर : पंढरपुरातील एका तरुणाने इस्रोत भरारी घेतली आहे.भारतीय अंतराळ संस्था इस्त्रोमध्ये काम करावे असे अनेकांचे स्वप्न असते.असेच स्वप्न पूर्ण केले आहे पंढरपुरातील सोमनाथ नंदू माळी या तरूणाने. विशेष म्हणेज भारतातील दहा जणांची निवड झालेल्यांमध्ये महाराष्ट्रातून तो एकमेव तरुण आहे. सोमनाथ नंदू माळी पंढरपुर तालुक्यातील सरकोली इथे राहतात. सोमनाथचे आईवडील आणि एक भाऊ दुसऱ्याच्या शेतात जाऊन मोल मजुरी करतात. मात्र असे असतानाही सोमनाथने जिद्दीने शिक्षण घेत थेट इस्रोपर्यंत मजल मारली आहे. Perseverance-Dream-Fulfillment-Patience-Quarantine-Celebration! A Story of Success in Pandharpur ;Somnath Mali has been selected as a Senior Scientist in ISRO

नुकतीच त्याची तिरुअनंतपुरम (केरळ) येथील ‘विक्रम साराभाई स्पेस सेंटर’ मध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली. विशेष म्हणजे यासाठी भारतातून दहा जणांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रामधून निवड झालेला सोमनाथ हा एकमेव विद्यार्थी आहे.

सोमनाथने एमटेक पूर्ण केल्यानंतर इन्फोसेसमध्ये नोकरी करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी विमानाच्या इंजिन डिझाईनवर काम करण्याची संधी त्यांना मिळाली. पण त्याला इस्रोमध्ये काम करायचे स्वप्न उराशी बाळगले होते. त्यानुसार त्यांनी त्या दिशेने प्रयत्न सुरु केले.नोव्हेंबर 2019 मध्ये सोमनाथने इस्त्रोसाठी अर्ज केला. एमटेकचे शिक्षण आणि इन्फोसिस मधील नोकरीचा अनुभव यामुळे अखेर सोमनाथला 2 जूनला इस्रोमध्ये नोकरीची ऑफर आहे. यावेळी त्याची वरिष्ठ शास्त्रज्ञ या पदासाठी निवड झाली आहे.

उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद

दरम्यान घरातील परिस्थिती हलाखीची असताना शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर आता उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण आहे. त्यामुळे कुटुंबियांच्या घामाचे सोने झाले, अशी प्रतिक्रिया सोमनाथने दिली.

सरकोली सारख्या ग्रामीण भागातून सोमनाथने मिळवलेले यश लक्षणीय आहे. गावातीलच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतून सातवीपर्यंतचे तर माध्यमिक शाळेतून दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यावर सोमनाथने अकरावी शास्त्र शाखेत पंढरपूर येथील केबीपी महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेथे विनायक परिचारक यांच्या मार्गदर्शनामुळे स्वतःतील क्षमतेची जाणीव होऊन त्यांनी दाखवलेल्या मार्गावर जाण्याचा निश्चय सोमनाथने केला. याच वेळी अशिक्षित वडील सोमनाथच्या शिक्षकांना भेटायचे तेव्हा मुलाचे कौतुक ऐकून त्यांचा ऊर अभिमानाने भरून यायचा.

स्वप्नपूर्ती -संयम-क्वारंटाईन-सेलिब्रेशन

सोनेरी यश बारा दिवस ठेवले झाकून दोन जून रोजी निवड झाल्याचा मेल सोमनाथला मिळाला खरा, पण त्याने या यशाचा सामना हुरळून न जाता अत्यंत संयमाने केला. त्या दिवशी तो दिल्लीत होता. स्वप्नपूर्तीचा आनंद साजरा करण्यासाठी तो ताबडतोब सरकोली (ता.पंढरपूर) या गावी येण्यास निघाला. पण सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता जर आपली इस्रोमध्ये निवड झाल्याचे घरी सांगितले तर ही बातमी गावात आणि तालुक्यात सगळीकडे पसरून लोक घरी गर्दी करतील. या विचाराने त्याने एवढी मोठी बातमी वडिलांव्यतिरिक्त कोणालाही सांगितली तर नाहीच पण गावी आल्यानंतरही स्वतःला दहा दिवस काॅरंटाईन करून घेतले.

या बारा दिवसात त्याने आणि वडीलाने निवड झाल्याचे स्वतःच्या आईसह कोणालाही सांगितले नाही. शेवटी काॅरंटाईनचे दहा दिवस पूर्ण झाल्यानंतरच आपला आनंद सर्वांसोबत शेअर करण्यास सुरुवात केली.

Perseverance-Dream-Fulfillment-Patience-Quarantine-Celebration! A Story of Success in Pandharpur ; Somnath Mali has been selected as a Senior Scientist in ISRO

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था