पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारने घेतला तालीबानी आदर्श, शिक्षिकांना जीन्स, टीशर्ट घालण्यास बंदी


विशेष प्रतिनिधी

इस्लामाबाद : अफगणिस्थानचा कब्जा घेतल्यावर तालीबान्यांनी महिलांवर कठोर निर्बंध लादले आहेत. त्याचा आदर्श जणू पाकिस्तानातील इम्रान खान यांच्या सरकारने घातला आहे. शिक्षिकांसाठी सरकारने फर्मान जारी केले असून जीन्स, टी शर्ट घालण्यास बंदी केली आहे.Pakistan’s Imran Khan government adopts Taliban ideology, banning teachers from wearing jeans and T-shirts

केंद्रीय शिक्षण संस्थेच्या अतंर्गत येणाºया सर्व शाळा, कॉलेज किंवा विद्यापीठात हा आदेश लागू करण्यात येणार आहे. येथील शिक्षिकांनी जीन्स, टी शर्ट किंवा टाईटस परिधान करू नयेत असे म्हटले आहे. यापूर्वी बहावलपूर मेडीकल कॉलेजमध्येही विद्यार्थिनींना जीन्स घालण्यास बंदी करण्यात आली होती..



पाकिस्तानातील प्रसिध्द शिक्षणतज्ज्ञ परवेझ हुदभाय यांच्यासह अनेकांनी या आदेशाचा विरोध केला आहे. इम्रान खान यांचे सरकार प्रत्येक गोष्टीत पाकिस्तानला मागे आणत आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाऐवजी आता सरकार तालीबानी पध्दतीची तालीम देण्याचा विचार करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सरकारने आपल्या आदेशात म्हटले आहे की संशोधनाने सिध्द झाले आहे की पोषाखाचा लोकांच्या मनावर परिणाम होत असतो. त्याचा सर्वात वाईट परिणाम विद्यार्थ्यांवर होतो. त्यामुळे आम्ही ठरविले आहे की शिक्षिका आता जीन्स किंवा टी शर्ट परिधान करू शकणार नाहीत. त्यांना वर्गामध्ये शिकविताना टिचींग गाऊन किंवा कोट घालावा लागेल.

ज्या देशाचा पंतप्रधानच महिलांवर अत्याचाराचे कारण त्यांचे कपडे मानतो तेथे अशाच प्रकारचे आदेश येत राहतील अशी टीका पाकिस्तानातील टीव्ही चॅनलवरून होत आहे. इम्रान खान यांनी नुकतेच एका भाषणात म्हटले होते की विदेशी कपडे आणि दुसऱ्या देशांतील चित्रपटांमुळे महिलांवरील अपराधाचे प्रमाण वाढत आहे.

Pakistan’s Imran Khan government adopts Taliban ideology, banning teachers from wearing jeans and T-shirts

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात