राष्ट्रवादी श्रीमंत मराठ्यांचा पक्ष, काँग्रेस – राष्ट्रवादीचा शिवशक्ती – भीमशक्तीला विरोध; प्रकाश आंबेडकरांचा नाशिक मधून हल्लाबोल


प्रतिनिधी

नाशिक : महाविकास आघाडीने मुंबईत आयोजित केलेल्या महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शिवशक्ती – भीमशक्ती एकजुटीवर नाशिक मध्ये भाष्य केले आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचा वंचित बहुजन आघाडीला सामाजिक विरोध आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा श्रीमंत मराठ्यांचा प्रतिनिधित्व करणारा पक्ष आहे. त्यांना शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र यायला नको आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीशी युती करायची की नाही हे उद्धव ठाकरे यांनी ठरवावे, असे वक्तव्य आंबेडकर यांनी केले आहे. Nationalist Party of Rich Marathas, Congress – Opposition to NCP Shivshakti – Bhimshakti

धम्म मेळाव्यानिमित्त प्रकाश आंबेडकर नाशिक मध्ये आले आहेत. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकर यांनी शिवशक्ती – भीमशक्ती एकत्र येण्यासंदर्भात भाष्य केले. प्रबोधन डॉट कॉमच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले होते. त्या वेळेपासूनच शिवशक्ती – भीमशक्ती एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. आम्हा दोघांमध्ये भेटी झाल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीशी शिवसेनेने युती करावी अशी ऑफरही दिली आहे. त्यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले होते. या संदर्भात त्यांनी महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांची चर्चा केली की नाही ही माहिती नाही. वंचित बहुजन आघाडीचा समावेश महाविकास आघाडीत करण्याबाबत चर्चा झाल्याचे वक्तव्य अजित पवार यांनी केल्याचे माध्यमांमधून वाचले. पण त्यापुढे कुठले पाऊल पडलेले दिसत नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा मूळातच वंचित बहुजन आघाडीला सामाजिक पातळीवर विरोध आहे. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष श्रीमंत मराठ्यांचेच प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीशी युती करायची की महाविकास आघाडी बरोबर जायचे हे ठरवायचे आहे. बॉल आता त्यांच्या कोर्टात आहे, असेही स्पष्टीकरण प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहे.

मुंबईत आज महाविकास आघाडीचा महामोर्चा सुरू असताना प्रकाश आंबेडकर यांचे शिवशक्ती – भीमशक्ती संदर्भात वक्तव्य येणे याला विशेष महत्त्व आहे. महामोर्चात शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, समाजवादी पक्ष, संभाजी ब्रिगेड, मराठा ठोक मोर्चा यांचे प्रतिनिधी सामील असताना प्रकाश आंबेडकर यांनी शिवशक्ती – भीमशक्ती एकजुटीच्या मुद्द्यावर नेमका कोणाचा विरोध आहे हे उलगडून सांगितल्याने महाविकास आघाडीचे राजकीय पंचाईत होऊ शकते. मुंबईतल्या महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर आणि त्यानंतरच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याला विशेष महत्त्व आहे.

Nationalist Party of Rich Marathas, Congress – Opposition to NCP Shivshakti – Bhimshakti

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात