नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर प्रथमच स्वतंत्र सुरक्षाविषयक धोरण तयार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची माहिती

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर देशाचे प्रथमच स्वतंत्र सुरक्षाविषयक धोरण तयार करण्यात आले आहे.भारताच्या सीमेवर असलेल्या कुंपणामध्ये पुढील वर्षीपर्यंत एकही खिंडार राहणार नाही, या दृष्टिकोनातून सरकार काम करीत आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. Narendra Modi became the Prime Minister, an independent security policy has been formulated, Union Home Minister Amit Shah

रुस्तमजी स्मृती व्याख्यानमालेत अमित शहा बोलत होते आणि या व्याख्यानाला सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या वेळी गृहमंत्र्यांच्या हस्ते शौर्यपदकेही प्रदान करण्यात आली. शहा म्हणाले, भारताच्या सुरक्षा धोरणावर यापूर्वी एकतर परदेशी धोरणाचा प्रभाव होता अथवा ते परदेशी धोरणाशी मिळतेजुळते होते,मात्र नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर देशाचे प्रथमच स्वतंत्र सुरक्षाविषयक धोरण तयार करण्यात आले. या देशाचे सुरक्षा धोरण आहे की नाही, असा आपण विचार करीत होतो, नरेंद्र मोदी पंतप्रधान होईपर्यंत देशाचे स्वतंत्र सुरक्षा धोरण नव्हते, आपल्या देशाच्या सुरक्षा धोरणावर परदेशी धोरणाचा प्रभाव होता किंवा ते त्याच्याशी मिळतेजुळते होते.

मात्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर देशाला स्वतंत्र सुरक्षा धोरण लाभले.देशाच्या जवळपास तीन टक्के सीमेवर सध्या कुंपण नाही आणि त्यामुळे दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यासाठी मोठी जागा उपलब्ध होत आहे, तेथूनच शस्त्रे, अमली पदार्थ यांची तस्करी केली जात आहे, असे गृहमंत्री म्हणाले. भारत लवकरच ड्रोनविरोधी तंत्रज्ञान विकसित करणार आहे.

सर्वांशी सलोख्याचे संबध असावे असेच आम्हाला वाटते, परंतु जर कोणी आमच्या सीमेवर शांतताभंग केला, अथवा आमच्या सार्वभौमत्वाला कोणी आव्हान दिले तर अशा प्रकारांना त्याच भाषेत सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल, आमच्या सुरक्षा धोरणाचा हाच प्राधान्यक्रम आहे. सुरक्षा धोरण हे मोठे यश आहे, देशाला अशा उत्तम योजनेची गरज होती, सुरक्षा धोरणाविना देश प्रगती करू शकत नाही किंवा लोकशाहीची भरभराट होऊ शकत नाही, मोदी यांनी उत्तम कामगिरी केली आहे.

Narendra Modi became the Prime Minister, an independent security policy has been formulated, Union Home Minister Amit Shah

महत्त्वाच्या बातम्या