पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुरूवारपर्यंतच्या सर्व नियोजित बैठका रद्द


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुरूवारपर्यंतच्या सर्व नियोजित बैठका रद्द करण्यात आल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. पंतप्रधानांची आज सायंकाळी सर्व मंत्र्यांसमवेत बैठक होणार होती. ती देखील रद्द करण्यात आली आहे.meetings between Tuesday and Thursday stand cancelled, reveal sources. PM’s meeting with ministers also cancelled.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत एक महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याची बातमी मीडियाने दिली होती. त्यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात कोण कोण सामील होणार याची यादीही मीडियाने दिली होती. २० पेक्षा जास्त मंत्र्यांचा समावेश केंद्रीय मंत्रिमंडळात करण्यात येणार असल्याच्या खात्रीलायक बातम्या मीडियाने नावांसकट दिल्या होत्या.यात नारायण राणे, सर्वानंद सोनावाल, सुशीलकुमार मोदी, ज्योतिरादित्य शिंदे यांची नावे आघाडीवर असल्याची चर्चाही बातम्यांमध्ये करण्यात आली होती. उत्तर प्रदेश, पंजाब या राज्यांना डोळ्यासमोर ठेवून मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येईल, असाही कयास लावण्यात येत होता.

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी पंतप्रधान सर्व मंत्र्यांची एक बैठक आपल्या ७ लोककल्याण मार्ग या निवासस्थानी घेतील, असे सांगण्यात आले होते. परंतु, पंतप्रधानांची आजचीच बैठक नव्हे, तर आजच्या बरोबर उद्या आणि परवा म्हणजे गुरूवार पर्यंतच्या सर्व नियोजित बैठका रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.बैठका रद्द झाल्याने त्याविषयी अटकळी लावण्याचा बाजार गरम झाला आहे. सोशल मीडियात देखील यावर चर्चा सुरू झाली आहे.

meetings between Tuesday and Thursday stand cancelled, reveal sources. PM’s meeting with ministers also cancelled.

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण