Anil Parab ED : अनिल परबांवर छाप्यांसाठी राऊतांच्या अर्ज भरण्याचा मुहूर्त; गोपीकिशन बजोरियांची देखील आठवण!!

महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आणि उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय अनिल परब यांच्या निवासस्थानावर छाप्यांसाठी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने संजय राऊत यांचा राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा राजकीय मुहूर्त साधण्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पण या चर्चेत बरोबरच आणखी एक चर्चेने जोर धरला आहे तो गोपीकिशन बजोरिया यांच्या विधान परिषद निवडणुकीच्या!! Moment of filling Raut’s application for raids on Anil Paraba

वास्तविक आजचा संजय राऊत यांचा अर्ज दाखल करणे गोपीकिशन बजोरिया हे विधानपरिषद निवडणुकीत पडणे आणि ईडीची छापेमारी या घटनांचा परस्परांशी थेट साखळी संबंध जोडता येणार नाही. खरे म्हणजे ईडीच्या छाप्यांचा थेट संबंध तर अजिबात नाही. पण म्हणून त्याचा राजकीय संबंध जोडताच येणार नाही किंवा जोडणे फारच गैर ठरेल असेही अजिबात नाही!!

संजय राऊत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत राज्यसभेसाठी अर्ज दाखल करत आहेत. याचा अर्थ दोन बलाढ्य पक्षप्रमुखांचा “पक्का” पाठिंबा शिवसेनेच्या या “पक्क्या मावळ्याला” आहे, (असे या पक्क्या मावळ्याने गृहीत धरले आहे.) पण तरी देखील अनेकांनी ओमप्रकाश बजोरिया यांची मध्येच आठवण काढून “कुछ तो गडबड हे दया”, अशी पुडी सोडून दिल्याने राऊत समर्थकांच्या पोटात धस्स झाले आहे.



गोपीकिशन बजोरिया हे विधान परिषदेवर खात्री निवडून येणारे आमदार होते. त्यांच्याकडे अकोला वाशिम मध्ये मतदानाची भरभक्कम बेगमी असताना शिवसेनेचे उमेदवार म्हणून ते पडले. नाना पटोले यांनी आपली राजकीय करामत दाखवली. त्यामुळे संजय राऊत यांच्या निवडणुकीबाबत शंका व्यक्त करण्यासाठी अनेक जणांना गोपीकिशन बजोरिया यांची आठवण झाली आहे आणि त्यात आता अनिल परब यांच्या निवासस्थान वरील छाप्यांची भर पडली आहे.

मध्यंतरी शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून आले होते. संजय राऊत यांच्यासारख्या पत्रकारावर ईडीची कायदेशीर कारवाई वगैरे बाबींवर त्यांनी चर्चा केली होती. पण तरीदेखील ईडीची कारवाई थंडावलेली दिसली नाही. मग शरद पवार यांनी संजय राऊत यांच्या बाजूने शिष्टाई केली की अन्य काही??, अशी शंका आता निर्माण झाली आहे.

अनेक जण अनिल परब यांच्या घरावरील छापायांचा संबंध मुंबई महापालिकेच्या निवडणुकीशी जोडत आहेत. तो संबंध तसा नसेल असे समजण्याचे काही कारण नाही. पण आज जेव्हा स्वतः संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या प्रत्यक्ष साक्षीने राज्यसभेसाठी चौथ्यांदा अर्ज भरत आहेत तेव्हाचा “राजकीय मुहूर्त” मात्र ईडीच्या छाप्यांसाठी साधला गेला आहे हे मात्र नक्की!!

मग त्याचे परिणाम गोपीकिशन बजोरिया यांच्या निवडणूकीसारखे होतात की ते दूरपर्यंत जाऊन मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर होतात हे पाहायला अजून अवकाश आहे.

Moment of filling Raut’s application for raids on Anil Parab

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात