खंजीर खुपसण्याची भाषा जपून वापरा!!; पवारांच्या भेटीनंतर संजय राऊतांचा मराठा संघटनांना इशारा


प्रतिनिधी

मुंबई : संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभा अपक्ष उमेदवार निवडून संतप्त झालेल्या मराठा संघटनांनी शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी देखील मराठा संघटनांना प्रति इशाला दिला आहे. खंजीर खुपसण्याची भाषा जपून वापरा. शिवसेनेने स्वतःच्या वाट्याची जागा छत्रपती संभाजीराजे यांना देऊ केली होती. याला खंजीर खुपसणे म्हणतात का?, असा सवाल राऊत यांनी शरद पवार यांना भेटून आल्यानंतर मराठा संघटनांना केला आहे.Use the language of stabbing carefully !!; Sanjay Raut’s warning to Maratha organizations after Pawar’s visit

संजय राऊत उद्या शिवसेनेकडून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्या वेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेनेचे अन्य नेते तसेच महाविकास आघाडीचे गटनेते देखील उपस्थित राहणार आहेत.या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सिल्वर ओक येथे जाऊन शरद पवारांची भेट घेतली. त्यांचे आशीर्वाद देण्यासाठी आपण गेलो होतो. त्यांच्याशी राज्यसभा निवडणूक आणि अन्य विषयांवर सविस्तर चर्चा झाली. शिवसेनेचे दोन उमेदवार निवडून आणण्यावर शरद पवार ठाम आहेत, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. त्याच वेळी मराठा संघटनांनी खंजीर खुपसण्याची भाषा जरा जपून वापरावी. कारण शिवसेनेने स्वतःच्या वाट्याची जागा छत्रपती संभाजीराजे यांना देऊ केली होती. संभाजीराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्यांना पक्षाची जागा घेणे काहीच गैर नव्हते. शेवटी राजकीय पक्षांची मजबुरी असते. ती त्यांनी समजून घ्यायला हवी होती, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.

मात्र संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या भेटीनंतर मराठा संघटनांना थेट इशारा दिल्याने या विषयाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

मराठा संघटनांनी एकाच वेळी संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. परंतु त्यातही मराठा संघटनांचा जास्त कटाक्ष हा संजय राऊत यांच्यावर होता. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांनी मराठा संघटनांना खंजीर खुपसण्याची भाषा जपून वापरा असा इशारा देण्याला राजकीय दृष्ट्या विशेष महत्त्व असल्याचे मानले जात आहे.

Use the language of stabbing carefully !!; Sanjay Raut’s warning to Maratha organizations after Pawar’s visit

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती