पेट्रोल – डिझेल : रुपया – रूबल दर विनिमय दराच्या नियोजनातून रशियाकडून स्वस्त तेल खरेदीची मोदी सरकारची तयारी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : रशिया – युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात तेल प्रचंड महाग झाले असताना भारताला जो इंधन दरवाढीचा सामना करावा लागत आहे, त्यावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यातला एक प्रयत्न म्हणून रुपया – रूबल विनिमय दराच्या नियोजनातून भारत रशिया कडून अधिकची तेल खरेदी करण्याची तयारी करत आहे. यासंदर्भात रशियाशी वाटाघाटी सुरू आहे त्या लवकरच फलद्रूप होतील, अशी आशा केंद्रीय अर्थ मंत्रालयाने व्यक्त केली आहे. Rupee – Modi government prepares to buy cheaper oil from Russia through ruble exchange rate planning

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोनच दिवसांपूर्वी पेट्रोलच्या उत्पादन शुल्कात 8.00 रुपयांची घट केली. त्यामुळे पेट्रोल सुमारे 14 रुपयांनी देशभरात स्वस्त झाले, तसेच डिझेल देखील 3.50 रुपयांनी स्वस्त झाले. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे सर्वसामान्य ग्राहकाला याचा लाभ होतोय का नाही?, ते पाहण्यासाठी सरकारने सर्व राज्यांमध्ये निरीक्षक पथके पाठवली आहेत. सर्वसामान्य ग्राहकांना पेट्रोल – डिझेलच्या दरामध्ये घट झालेली जाणवली पाहिजे, याकडे केंद्र सरकारचा विशेष कटाक्ष आहे.

त्याचबरोबर त्या आंतरराष्ट्रीय बाजारातून तेल खरेदी करताना रुपया – रूबल विनिमय दरातील नियोजन करून रशियाकडून जास्तीत जास्त तेल खरेदी करण्याचे नियोजन केंद्र सरकार करत आहे. भारत आणि रशिया यांच्यात तेल किमतीच्या वाटाघाटी यशस्वी झाल्या तर भारताला अधिक स्वस्त दरामध्ये तेल उपलब्ध होईल आणि भारताची गरज अंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या वाढीव किमतीच्या तुलनेत स्वस्तामध्ये भागेल, असे अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

Rupee – Modi government prepares to buy cheaper oil from Russia through ruble exchange rate planning

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात