ED Raids On Anil Parab : परिवहन मंत्री अनिल परबांच्या शासकीय निवासस्थानासह 7 ठिकाणी ईडीचे छापे; बजरंग खरमाटेही छाप्यांच्या जाळ्यात


वृत्तसंस्था

मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीने छापा टाकला आहे. आज सकाळीच 6.30 च्या सुमारास ईडीच्या पथकाने अनिल परब यांच्या शासकीय आणि वांद्रे येथील खासगी निवासस्थानी छापा घातला आहे. अनिल देशमुख यांनी केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणी ही कारवाई झाली आहे. ED Raids On Anil Parab: ED raids 7 places including Transport Minister Anil Parab’s official residence

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनिल परब यांच्या घरावर आणि अन्य 7 ठिकाणी ईडीने छापा टाकल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे.  अनिल परब यांच्या बरोबरच आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या पुण्यातल्या निवासस्थानावर देखील ईडीचे अधिकारी पोहोचून त्यांनी छापा घातला आहे.

आज सकाळी ईडीने अनिल परब यांचे शासकीय निवासस्थान ‘अजिंक्यतारा’ आणि वांद्रेतील खासगी निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित 7 ठिकाणांवर छापा घातला आहे.



मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात अनिल देशमुख यांना ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक केली होती. पोलीस बदली प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. त्याशिवाय, अनिल परब यांच्या दापोली येथील रिसॉर्ट प्रकरणात ही कारवाई झाली असल्याचे म्हटले जात आहे. ईडीने दापोली रिसॉर्ट प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.

– सचिन वाझे कनेक्शन?

पोलीस बदल्यांप्रकरणी आरोपी सचिन वाझेंच्या जबाबामध्ये अनिल परब यांचे नाव समोर आले होते. वाझेच्या जबाबानंतर ईडीकडून तपास सुरू झाला. त्याच अनुषंगाने ईडीने आज छापा घातला.

– किरीट सोमय्यांचे ट्विट

अनिल परब यांनी आता आपली बॅग भरावी अशी उपरोधिक प्रतिक्रिया भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली. अनिल परब यांच्यावर आता ईडीकडून अटकेची कारवाई होण्याचे संकेत सोमय्या यांनी दिले. अनिल परब यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांचा नंबर लागणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

ED Raids On Anil Parab: ED raids 7 places including Transport Minister Anil Parab’s official residence

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात