Minister Manik Saha : ‘भारताशिवाय बांगलादेशची स्थिती सुधारू शकत नाही’

Minister Manik Sah

त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांचे विधान


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारताशिवाय बांगलादेशातील परिस्थिती सुधारू शकत नाही, असे त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा  ( Minister Manik Saha )  यांनी म्हटले आहे. शुक्रवारी जागतिक पर्यटन दिनानिमित्त एका सरकारी कार्यक्रमात बोलताना साहा म्हणाले की, बांगलादेशच्या लोकांनी त्यांच्या स्वातंत्र्यासाठी भारताचे योगदान लक्षात ठेवले पाहिजे.



ते म्हणाले, ‘बांगलादेशबद्दल बोलण्यात अर्थ नाही, भारताशिवाय बांगलादेशची स्थिती सुधारू शकत नाही. बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या सैन्याने किती बलिदान दिले आणि आपल्या लोकांनी किती मदत केली हे त्यांनी समजून घेतले पाहिजे. हे विसरता कामा नये

साहा म्हणाले की, मी त्यांना पुन्हा पुन्हा सांगेन की, त्रिपुरातील जनतेने तुमच्या स्वातंत्र्यासाठी कशी मदत केली हे त्यांनी लक्षात ठेवावे. आम्ही शक्य ती सर्व मदत केली… बांगलादेशात जी परिस्थिती आहे, ती जास्त काळ टिकू शकत नाही.

Minister Manik Saha said that the condition of Bangladesh cannot improve without India

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात