विशेष प्रतिनिधी
सोमनाथ : पहिले ज्योतिर्लिंग सोमनाथ मंदिराच्या परिसरात विविध अतिक्रमणांवर गुजरात सरकारने आज तडाखेबंद कारवाई केली. 36 बुलडोझर, 70 ट्रॅक्टर ट्रॉली कामाला लावून सोमनाथ मंदिराच्या मागच्या परिसरातील सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून बांधलेल्या मशीद आणि दर्ग्यांचे बांधकाम काढून टाकले. यावेळी तब्बल 1500 पोलीस प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी सरकारने तैनातच ठेवले होते.
सुरुवातीला अतिक्रमण विरोधी पथकाला स्थानिकांनी विरोध केला. मोठा जमाव जमा करून तिथे तणाव निर्माण केला, पण गुजरात पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करून 70 जणांना ताब्यात घेतले. अतिक्रमण विरोधी पथकाच्या कारवाईला विरोध करणाऱ्या जमावाला तिथून हटविले. त्यानंतर प्रशासनाने धडक कारवाई करून सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून बांधलेली मशिद पाडली.
Rhea Barde : द फोकस एक्सप्लेनर : बन्ना शेख कशी झाली रिया बर्डे? भारतात अश्लील चित्रपट बनवले… अटकेतील बांगलादेशी पॉर्न स्टारची संपूर्ण कहाणी
तिथे काही दर्गे देखील असेच अतिक्रमण करून बांधले होते, ते देखील उद्ध्वस्त करून टाकले. यामध्ये हाजी मंगलोरीशा पीर दर्गा, हजरत माईपुरी दर्गा, सिपे सालार दर्गा, मस्तानशा बापू दर्गा यांचा समावेश होता.
सोमनाथच्या मंदिर परिसराभोवती अतिक्रमणांचा मोठा विळखा पडला होता. तो प्रशासनाने कठोर कारवाई करत हाणून पाडला. यासाठी प्रशासनाने 36 बुलडोझर, 5 हिताची ड्रिलिंग मशीन 50 ट्रॅक्टर, 10 डंपर, 70 ट्रॅक्टर ट्रॉली कामाला लावल्या होत्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App