Jayant Patil : पवारांच्या मनातल्या नावाला काटशह; जयंत पाटलांनी बोलून दाखविला मुख्यमंत्रीपदाचा मोह!!

Jayant Patil

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री पाहण्याची इच्छा बोलून दाखवली. पण त्यांच्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पवारांच्या मनातल्या मुख्यमंत्र्यांना काट शह देत आपल्या मुख्यमंत्रीपदाचा मोह बोलून दाखविला.

शरद पवारांनी यांनी शिर्डीत झालेल्या सभेत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे नेतृत्त्व देण्याचं विधान केलं होतं. पण त्यानंतर शिरूर तालुक्यामध्ये महिला मुख्यमंत्री पाहण्याची इच्छा बोलून दाखवली होती, पण या दोन्ही नावांना बाजूला सारून जयंत पाटील यांनी बोल भिडू युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत देखील मुख्यमंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली.


Ajit Pawar मी शरद पवार साहेबांना सोडले नाही; निवडणुकीच्या तोंडावरच अजित पवारांचे मोठे विधान


जयंत पाटील म्हणाले :

राजकारणात असणाऱ्या प्रत्येकाचीच मुख्यमंत्री होण्याची इच्छा असते. मी एकूण सात वेळा मी विधानसभा निवडणूक जिंकलेली आहे. आता आठव्या वेळेला पण जनता मला साथ देईल असा विश्वास वाटतो.

मुख्यमंत्री होण्याची इच्छा तर आहे पण 23 तारखेला जनतेचा कौल काय असेल ते पाहणे महत्त्वाचे आहे. त्यामध्ये आमदारांचे संख्याबळ देखील महत्त्वाचे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पराबाबत 23 नोव्हेंबरला बोलू.

जयंत पाटलांनी आपल्या वक्तव्यातून स्वतःची महत्त्वाकांक्षा तर जाहीर केलीच पण यातून त्यांनी पवारांच्या मनातल्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाला काटशह दिला. काँग्रेस नेत्यांच्या मनातल्या महत्त्वाकांक्षेला सुरुंग लावला.

Jayant Patil has spoken about his fascination for the post of Chief Minister

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात