‘मी दुर्गा मातेला प्रार्थना करेन की…’, अमित शाहांचा मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर निशाणा

मी हेच काम करण्यासाठी सकाळी गुजरातवरून निघालो आणि छत्तीसगड मार्गे आज बंगालमध्ये आलो. असंही शाह म्हणाले.

विशेष प्रतिनिधी

कोलकाता   : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी (१६ ऑक्टोबर) त्यांच्या पश्चिम बंगाल दौऱ्याचा भाग म्हणून कोलकाता येथे दुर्गापूजेचे उद्घाटन केले आणि राज्यातील ममता बॅनर्जी सरकारवर निशाणा साधला. गृहमंत्री शाह म्हणाले, “बंगालमधून भ्रष्टाचार आणि अत्याचार संपुष्टात यावात, अशी मी दुर्गा मातेकडे प्रार्थना करेन.” तसेच, बंगालमध्ये येत राहून राज्यात परिवर्तनासाठी लढा देऊ, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. Home Minister Amit Shah targets Chief Minister Mamata Banerjee after attending Durga Puja in West Bengal

आपल्या भाषणादरम्यान गृहमंत्री शाह म्हणाले, “सर्व प्रथम, मी नवरात्रीच्या द्वितीय तिथीस  पश्चिम बंगालमधील सर्व लोकांना दुर्गापूजेच्या खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो. मी हेच काम करण्यासाठी सकाळी गुजरातवरून निघालो आणि छत्तीसगड मार्गे आज बंगालमध्ये आलो  आहे, ते म्हणजे केवळ आणि केवळ दुर्गा  देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी.  आपल्या शास्त्रांमध्ये सांगितल्यानुसार ज्या देवीने ब्रह्मांडात  नेहमीच सद्शक्तीचे रक्षण करण्यासाठी अनेक युद्ध करून रक्तबीजापपासून ते शुंभ,  निशुंभापर्यंत  अनेक असुरू तत्त्वांचा विनाश करण्याचे काम केले आहे.

ते म्हणाले, “पश्चिम बंगालसाठी हे नऊ दिवस दिवाळीपेक्षाही मोठा सण आहे, संपूर्ण बंगाल पंडालमधील मातेच्या भक्तीमध्ये गढून गेलेला आहे. संपूर्ण देश नवरात्रीमध्ये देवीची वेगवेगळ्या रूपात पूजा करतो, गुजरातमध्ये कुठेतरी ते मातेचे मंडप सजवतात आणि भक्तिगीते सादर करतात, पूर्व भारतात दुर्गा पूजा मंडप उभारून शक्तीची पूजा करतात, उत्तर भारतातही अनेक धर्म कर्मकांडातून शक्तीची पूजा करतात. चला पूजा करूया.”

Home Minister Amit Shah targets Chief Minister Mamata Banerjee after attending Durga Puja in West Bengal

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात