विशेष प्रतिनिधी
जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज हेमामालिनीच्या गालाप्रमाणे गुळगुळीत रस्त्याबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागितली आहे.Gulabrao Patil’s Finally an apology
काल भाषणादरम्यान विकास कामासंदर्भात बोलताना पाटील यांनी अभिनेत्री हेमामालिनी यांच्या गालांप्रमाणे गुळगुळीत रस्ते बनवण्याचे वक्तव्य केले होते. महिला आयोगातर्फे त्यावर तीव्र आक्षेप नोंदविण्यात आला होता.
गुलाबराव पाटील यांनी माफी न मागितल्यास त्यांच्यावर कायदेशीर नोटीस पाठवण्याचा इशारा देखील महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी दिला होता. यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी धुळे जिल्ह्यातील साक्री येथे आज या वक्तव्याबाबत माफी मागितली आहे.
भाषणातील माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करत माफी मागतो, असे गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App