मला मुख्यमंत्री बनवण्यात फडणवीसांचा त्याग आणि योगदान, दोघांमध्ये हिंदुत्वाचा मजबूत जोड; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला


प्रतिनिधी

मुंबई : मला मुख्यमंत्री बनविण्यात फडणवीसांचा त्याग आणि योगदान मोठे आहे. आमच्या दोघांमध्ये हिंदुत्वाचा फेविकॉल सारखा मजबूत जोड आहे. विरोधकांनी भांडण लावूनही तो तुटणार नाही, अशी निःसंदिग्ध ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत दिली. Fadnavis’ sacrifice and contribution in making me Chief Minister

मुख्यमंत्र्यांनी या मुलाखतीत महाराष्ट्राच्या विकासाचा आढावा घेतला. त्याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याबरोबरच्या संबंधांवर देखील भाष्य केले. मला मुख्यमंत्री बनवण्यात देवेंद्र फडणवीस यांचा त्याग आणि योगदान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री झालो हे खरे आहे, पण देवेंद्र फडणवीस आधी मुख्यमंत्री होते. ते त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठांच्या आदेशाने उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे त्यांनी त्याग करून मला मुख्यमंत्रीपदी विराजमान केले. मी त्यांना उपमुख्यमंत्री मानत नाही, तर माझे समकक्ष सहकारीच मानतो, असे उद्गार एकनाथ शिंदे यांनी काढले.

देवेंद्र फडणवीस यांचा त्याग मोठा आहे. आपला पक्ष वाढला पाहिजे. मोठा झाला पाहिजे. यासाठी त्यांनी वरिष्ठांचा आदेश मान्य करून उपमुख्यमंत्री पद स्वीकारले आणि आता अजित पवारांच्या रूपाने आणखी एक उपमुख्यमंत्री स्वीकारला. या दोन्ही नेत्यांच्या अनुभवाचा मला लाभ मिळतो आहे. आमच्या सरकारचे निर्णय त्यामुळे वेगाने होत आहेत, अशी पुस्तीही एकनाथ शिंदे यांनी जोडली.

देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात किती भांडणे लावण्याचे विरोधक कितीही प्रयत्न करत असले, तरी आमच्या दोघांचे संबंध उत्तम आहेत. आमच्या हिंदुत्वाचा जोड फेविकॉल सारखा मजबूत आहे. त्यात अजित पवारांची भर पडली आहे. त्यामुळे आमचे सरकार सर्वांत मजबूत सरकार आहे, अशी ग्वाही देखील एकनाथ शिंदे यांनी दिली.

Fadnavis’ sacrifice and contribution in making me Chief Minister

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात