70000 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करून आरोपींना तुरुंगात टाका; शरद पवारांचे पंतप्रधान मोदींना आव्हान

प्रतिनिधी

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या नेत्यांनी 70000 कोटींचा भ्रष्टाचार केला असेल, तर ते करणाऱ्या आरोपींना तुरुंगात टाका, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना येवल्यातल्या जाहीर सभेत दिले. Investigate the 70000 crore scam and put the accused in jail

राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर अजित पवारांचा गट राज्य सरकारमध्ये सहभागी झाला. यावेळी अजित पवारांसह इतर आठ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर झालेल्या समर्थकांच्या मेळाव्यात दोन्ही गटांनी एकमेकांवर येथेच्छ टीका केली. या मेळाव्यात शरद पवारांनी फुटीरांवर बोलण्यापेक्षा पुन्हा एकदा जनतेत जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्याची सुरुवात त्यांनी शनिवारी नाशिकमधील येवल्यातून केली.

यावेळी शरद पवार यांनी केंद्र सरकारसह राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरांवर निशाणा साधला. छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली म्हणून शरद पवार यांनी नाशिककरांची माफी मागितली. पवार म्हणाले, “आता कुणावरही टीका करणार नाही. नाशिक जिल्ह्याने राष्ट्रवादी काँग्रेसला पहिल्यापासून साथ दिली. यावेळी मात्र उमेदवाराबाबत माझा अंदाज चुकला. मी केलेल्या चुकीबाबत तुमची माफी मागतो. अशी चूक पुन्हा होणार नाही, अशी ग्वाहीही देतो.”

यानंतर त्यांनी फुटीरांबाबत वक्तव्य करताना पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आव्हान दिले. राज्यात जी अस्थिरतेची स्थिती निर्माण झाली आहे, त्याला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोपही यावेळी पवार यांनी केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील जे घोटाळेबाज असतील त्यांना तुरुंगात टाका, असेही आव्हान देत पवार यांनी मोदींनी केलेल्या आरोपांचे खंडण केले आहे.

शरद पवार म्हणाले, “नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रसमधील नेत्यांनी 70000 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आपल्या नेत्यांनी जो घ्यायचा तो निर्णय घेतला. मात्र मोदींना सांगतो की तुम्ही सर्व यंत्रणांचा वापर करून राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या आरोपांची चौकशी करा. यात जो कुणी आरोपी सापडला तर त्यांना तुरुंगात टाका.”

Investigate the 70000 crore scam and put the accused in jail

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात