गडचिरोली दौऱ्यावरून परतताना मुख्यमंत्री शिंदेंना दिसली रस्त्यावर बंद पडलेली रुग्णवाहिका, त्यानंतर…


जाणून घ्या नेमकं काय घडलं, घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ‘शासन आपल्या दारी’ या महाराष्ट्र शासनाच्या अत्यंत लोकाभिमुख अभियानाचा पुढचा टप्पा पार पडण्यासाठी  मुख्यमंत्री काल गडचिरोलीला गेले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.   कार्यक्रम आटोपून मुंबईकडे परतत असताना, त्यांना मार्गात एक रुग्णवाहिका बंद पडलेली दिसली. यानतंर पुढे काय घडले, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करून स्वत: माहिती दिली. While returning from a visit to Gadchiroli Chief Minister Shinde saw an ambulance on the road

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगतात, ‘’गडचिरोली येथील आपला नियोजित दौरा आटोपून ठाण्याकडे परतत असताना अचानक एक रुग्णवाहिका बंद अवस्थेत उभी असलेली दिसली. चुनाभट्टी – कुर्ला येथील पुलावर ही रुग्णवाहिका बंद पडलेली पाहून तातडीने माझ्या गाड्यांचा ताफा थांबवून या रुग्णवाहिकेची चौकशी केली.’’

याशिवाय ‘’यावेळी या रुग्णाचे नाव धर्मा सोनवणे असे असून त्याला नाशिकहून मुंबईत उपचारासाठी रुग्णवाहिकेतून आणण्यात आले असल्याचे समजले. मात्र या रुग्णाला दाखल करून घ्यायला रुग्णालयाने नकार दिल्याने या रुग्णाला पुन्हा नाशिककडे घेऊन जात असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी मला सांगितले. अखेर क्षणाचाही विलंब न करता ठाणे जिल्हा रुग्णालयात फोन करून या रुग्णाला दाखल करून त्यावर तातडीने उपचार करण्याचे निर्देश दिले. तसेच रुग्णाला तात्काळ मदत करण्यासाठी आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊ केली.’’ अशी माहितीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली.

While returning from a visit to Gadchiroli Chief Minister Shinde saw an ambulance on the road

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात