विशेष प्रतिनिधी
लातूर : Dr. Archana Patil Chakurkar लातूर शहरातील जनतेत असलेल्या दहशतीविरुद्ध, एकाधिकारशाही विरुद्धचा हा लढा आहे. सामान्य जनता गेल्या पंधरा वर्षातील निष्क्रियतेलास कंटाळली आहे. त्यामुळे मी लढणार आणि जिंकणारच असा विश्वास लातूर शहर मतदार संघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी व्यक्त केला Dr. Archana Patil Chakurkar
पटेल चौक येथे जाहीर सभेत बोलताना डॉ. पाटील म्हणाल्या, लातूर शहरातील सामाजिक एकोपा बिघडवण्याचे काम दिले पंधरा वर्षात झाली आहे. एक कुटुंब वगळता जनतेला स्वप्न पाहण्याचा अधिकार राहिला नाही. विरोधक मला विचारतात की, 15 दिवसात 15 वर्षाचा हिशोब मागताय. हिशोब मी मागत नाही , लातूरची जनता मागत आहे . लातूरचे मार्केट यार्ड 15/15 दिवस बंद राहते. हमाल – मापाडी लोकांची रोजी रोटी, कशी चालेल त्यासाठी हिशोब मागते. लातूरला महापालिका दवाखाना नाही, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नाही .
महायुतीच्या सरकारने लाडकी बहीण योजना आणली तेव्हा मुस्लिम, ख्रिश्चन, दलित हे बघितले नाही. सर्वांना पैसे दिले.आपल्या भावाला ओवाळणी म्हणून लाडक्या बहिणी महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आणणार आहेत, असा विश्वासही डॉ. पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना शिवसेनेचे संपर्क प्रमुख बळवंत जाधव म्हणाले की, लातुरात केवळ हिंदू – मुस्लीमच नाही तर विविध जाती धर्माचे लोक एकत्रित राहतात. सर्वांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. त्या सर्व समस्यांची सोडवणूक करण्यासाठी येत्या २० तारखेला कमळाच्या चिन्हासमारील बटन दाबून डॉ. अर्चनाताई पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन केले.
यावेळी विधानसभा प्रभारी शैलेश लाहोटी, शिवसेना संपर्कप्रमुख बळवंतराव जाधव, राष्ट्रवादीचे व्यंकट बेद्रे ,शैलेश गोजमगुंडे, जितेंद्र बनसोडे, सोनकांबळे, शिवसेना शहरप्रमुख दिनेश बोरा, बाळासाहेब अंकलकोटे, सोमनाथ खोबरे, आनंद अंकलकोटे, अभिजीत मुनाळे आदी कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App