- जनरल बिपीन रावत यांची स्पष्टोक्ती
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : ऐन युद्धाच्या धामधुमीत शस्त्राचा तुटवडा टाळण्यासाठी भारतात शस्त्रनिर्मितीला चालना देण्याची गरज आहे, असे मत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांनी व्यक्त केले. या संदर्भात त्यांनी ट्विट केले आहे. CDS General Bipin Rawat at DRDO
आपत्तीत परदेशी शस्त्रे वेळेवर पोचली नाहीत तर युद्ध जिंकता येणार नाही, असे सांगताना रावत म्हणाले, अशा काळात भारतीय शस्त्रे कामाला येतील. त्यामुळे काळाची गरज आणि भविष्यातील तयारीसाठी मेड इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत भारतीय कंपन्यांना शस्त्र निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. CDS General Bipin Rawat at DRDO
विशेष म्हणजे संरक्षण मंत्रालयाने 28 हजार कोटींच्या शस्त्र खरेदीस हिरवा कंदील दाखविला आहे. ही शस्त्रे मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत अंतर्गत देशातच तयार केली जाणार आहेत. त्यामुळे रावत यांच वक्तव्य महत्वपूर्ण मानलं जातं आहे.
संरक्षण क्षेत्र खुले
केंद्र सरकारने सैन्य दलाच्या आधुनिकिकरणासाठी पावले उचलली. त्याअंतर्गत देशातील खासगी कंपन्याना शस्त्र निर्मितीत सहभागी झाल्या आहेत.
फायदे
- स्वदेशी शस्त्रे कमी खर्चात तयार
- शास्त्रावर खर्च होणारे परदेशी चलन वाचेल
- परदेशी कंपन्यांची मूळ उपकरणे करार करून मिळू शकतील.
- संरक्षण सहित्याची निर्यात करणे सोपे
- 100 टक्के परदेशी गुंतवणुकीने पैशाचा प्रश्न सुटला
CDS General Bipin Rawat at DRDO
शस्त्रास्त्र निर्मिती कारखाने
देशातील 41 शस्त्रास्त्र निर्मिती कारखाने कार्पोरेट बनविले जाणार आहेत. लष्कराला लागणारे साहित्य, गणवेष, शास्त्र निर्मिती हे कारखाने करतात. मात्र अनेकदा तंत्रज्ञानाचा अभाव, वेळकाढूपणा यामुळे साहित्य वेळेवर पुरविले जात नाही. त्यामुळे हे कारखाने आत्मनिर्भर भारत अंतर्गत आधुनिक केले जाणार आहेत. ते कार्पोरेट बनणार आहेत.
Array