विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने घेरण्याचा प्रयत्न करून विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अंगावर येण्याची संधीच दिल्याचे आज स्पष्ट झाले. PM narendra modi exposed congress and opposition over farm bills
त्याचा लाभ मोदींनी उठवला नसता तरच नवल. मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांना संबोधित करताना मोदींनी काँग्रेससह विरोधकांची नुसतीच पोलखोल केली नाही, तर शेतकऱ्यांशी समंजस संवाद साधू, पण विरोधकांशी समोरूनच मुकाबला करू, असा स्पष्ट इशाराही देऊन टाकला आहे. मोदींनी काँग्रेससह विरोधकांवर बरसण्याची एकही संधी सोडली नाही. स्वामिनाथन कमिटीच्या रिपोर्टसह सगळ्या आकडेवारीसह त्यांची पोलखोल केली.
________________________________________________
कृषी कायदे शेतकरी हिताचे; आपण संवाद करू या; कृषीमंत्री नरेंद्रसिह तोमर यांचे भावनिक शेतकऱ्यांना भावनिकपत्र ________________________________________________
यातून शेतकऱ्यांच्या आडून किंवा खांद्यावर बंदूक ठेवून लढण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांना आता समोरून मोदींशी लढणे भाग पडणार आहे. आणि येथेच खरी राजकीय मेख आहे. मोदींनी आत्तापर्यंत शेतकरी आंदोलनावर भाष्य केले नव्हते. त्यावेळी मोदी तुम्ही स्वतः बोला.
शेतकऱ्यांना समोरे जा. त्यांच्या रागाचा सामना करा. असे सल्ले काँग्रससह सगळे विरोधक देत होते. आता मोदी खरेच समोर आले आहेत. त्यांनी शेतकऱ्यांशी सामंजस्याच्या भाषेत संवाद साधला आहे पण आता विरोधकांशी आक्रमकपणे मुकाबला करण्याच्या मूडमध्ये आले आहेत. हे स्वतः मोदींनी केलेले नाही. तर विरोधकांनी राजकीय दृष्ट्या त्यांना कॉर्नर करून अंगावर ओढून घेतले आहे.
मोदींनी मागच्या सरकारांच्या कामगिरीची पोल खोलायला सुरवात केली आहे. काँग्रेससह विरोधक आणखी खोलात गेले तर बुडत्याचा पाय खोलात अशीच त्यांची अवस्था करून ठेवण्याचा मोदींनी आजच्या भाषणातून इशाराच देऊन ठेवला आहे. विरोधकांच्या इच्छेनुसार मोदी फ्रंटफूटवर खेळायला आले आहेत. आता खरी विरोधकांची कसोटी आहे.
त्यांच्याकडे मोदींच्या तोडीस तोड देणारा कोणता नेता सामना करायला समोर येतोय याची मोदींपेक्षा देशातील जनता वाट पाहील. कारण मोदींनी आजच्या भाषणात मी परत २५ डिसेंबरला शेतकऱ्यांशी बोलायला येईन. नवीन घोषणा करेन असे म्हटले आहे. याचा अर्थ त्यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना सरकारशी वाटाघाटींसाठी एक् प्रकारे २५ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. तोपर्यंत शेतकरी सरकारशी संवाद साधून समाधान करून घेऊ शकतील. हा एक प्रकारे शेतकऱ्यांना आंदोलनातून समाधानकारक माघार घेण्याचा सेफ पॅसेजही देण्यात आला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App