तृणमूलचे सुवेंदू अधिकारी मोडणार की वाकणार?


  • सभापती बिमन बॅनर्जी यांनी राजीनामा फेटाळला

वृत्तसंस्था

कोलकत्ता : सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे आमदार सुवेंदू अधिकारी यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. परंतु सभापती बिमन बॅनर्जी यांनी फेटाळला आहे. परंतु अधिकारी मोडेन पण वाकणार नाही, या भूमिकेत आहेत. Biman banerjee rejected suvendu adhikar’s resignation

सभापती बिमन बॅनर्जी यांनी सांगितले की, मी अधिकारी यांचे पत्र वाचले आहे. त्यावर नेमकी तारीख नाही. अधिकारी यांचे पत्र अधिकृत आणि खरे असल्याची माहिती मला कोणी दिली नाही. त्यामुळे त्यांचा राजीनामा स्वीकारण अशक्य आहे. 21 डिसेंबर रोजी माझ्यासमोर हजर राहण्यास मी त्यांना सांगितले आहे. Biman banerjee rejected suvendu adhikar’s resignation

__________________________________________

ममतांच्या राजकीय गडाचे आणखी चिरे ढासळले; सुवेंदू अधिकारी समर्थक पाच नेत्यांचे राजीनामे

सुवेंदू अधिकारी हे तृणमूलचे विधानसभेतील मात्तबर नेते असून त्यांनी कॅबिनेट मंत्रिपद भूषविले आहे. बुधवारी सायंकाळी 4 वाजता त्यांनी विधानसभेतील सचिवांकडे राजीनामा दिला होता. पूर्व मिदानापूर जिल्ह्यातील नंदीग्राम विधानसभा मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करतात.

Biman banerjee rejected suvendu adhikar’s resignation

अमित शाह यांच्या दौऱ्यावेळी ते भाजपमध्ये प्रवेश करतील,असे निकटवर्तीयांनी यापूर्वीच सांगितले आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत असताना शाह यांचा दौरा आणि अधिकारी यांचा राजीनामा यामध्ये काही राजकीय घडामोडींचे संकेत मिळत आहेत.पण आता अधिकारी यांचा राजीनामा फेटाळल्यामुळे त्यांच्यापुढे पेच निर्माण झाला आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय