वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आपल्या देशाचे नाव “इंडिया” की “भारत” हा वाद विरोधी पक्षांनी घालायला सुरुवात केल्यानंतर मोदी सरकारने “भारत” या विषयावर ठाम भूमिका घेतली. आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर “द प्रेसिडेंट ऑफ भारत”, “द प्राईम मिनिस्टर भारत” असे लिहायला सुरुवात केली. आता त्यापुढे जाऊन देशातल्या शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रम मधल्या पाठ्यपुस्तकांमध्ये भारतात देशाचे नाव “इंडिया” ऐवजी “भारत” करण्याचे घाटक आहे. Approval of use of country name “Bharat” instead of “India” in NCERT textbooks
NCERT अर्थात नॅशनल कौन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग या मध्यवर्ती संस्थेने सर्व पाठ्यपुस्तकांमध्ये देशाचे नाव “इंडिया” ऐवजी “भारत” असे करवून घेण्यावर मंजुरी दिली आहे.
या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे ब्रिटिश काळातली गुलामगिरीची खूण पुसली जाऊन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव “भारत” असल्याचे ठळकपणे अधोरेखित होईल. “इंडिया” हे नामकरण ब्रिटिश गुलामीच्या काळात झाले. त्यापूर्वी या देशाचे नाव भारत, भारत वर्ष असेच होते. “भारत” हे नाव या देशाची जागतिक पातळीवरची सांस्कृतिक ओळख होती. परंतु देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली तरी गुलामीच्या मानसिकतेतून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर देशाचे नाव “इंडिया” असेच वापरण्यात येत होते.
पण मोदी सरकारने देशाच्या मूळ सांस्कृतिक ओळखीस प्राधान्य देत “भारत” या नावालाच पसंती दिली आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर “द प्रेसिडेंट भारत” आणि “द प्राईम मिनिस्टर भारत” असे लिहायला सुरुवात केली. त्यापुढे जाऊन NCERT ने आता पाठ्यपुस्तकांमध्ये देशाचे नाव “इंडिया” ऐवजी “भारत” असे छापण्याचे ठरविले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App