मुंबई :sharad pawar महाविकास आघाडीच्या दोन घटक पक्षांमध्ये म्हणजे काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी खरी टक्कर सुरू असताना शरद पवारांची राष्ट्रवादी खऱ्या अर्थाने स्पर्धेत देखील नाही. तरी देखील पवारांनी जयंत पाटलांकडे मोठी जबाबदारी येऊ शकते, असे सूचक वक्तव्य करून त्यांचे नाव मुख्यमंत्री पदाच्या रिंग मध्ये जरूर टाकले, पण प्रत्यक्षात जेव्हा वेळ येईल तेव्हा “त्यांच्यासारख्या” नेत्याला शरद पवार मोठे पद देतील का??, हा खरा सवाल आहे.sharad pawar
याची दोन कारणे आहेत, एकतर शरद पवारांना सुधाकरराव नाईक प्रकरणाचा जुना अनुभव आहे. ज्या सुधाकरराव नाईक यांना पवारांनी आपल्या “मर्जीतले” मुख्यमंत्री म्हणून 1991 मध्ये खुर्चीवर बसविले होते, त्यांनी अवघ्या वर्षभरात पवारांचा गोट सोडून नरसिंह राव यांचा गोट गाठला होता. त्यांनी पवारांच्या चेल्या चपाट्या गुंडांना थेट तुरुंगात घातले होते. सुधाकरराव नाईक यांनी पवारांच्या छत्रछायेखाली राहण्याचे केव्हाच सोडून दिले होते. त्यामुळे पवारांनी नंतर तशी “रिस्क” कधीच घेतली नाही. पवारांनी संधी असताना देखील राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रीच केला नाही.
पण त्या पलीकडे जाऊन जयंत पाटलांची “केस” थोडी वेगळी आहे. जयंत पाटील खरं म्हणजे अजितदादांबरोबरच पवारांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडणार होते. त्यावेळी तशा चर्चा देखील जोरावर होत्या, पण महायुतीतला सगळ्यात मोठा घटक पक्ष भाजपने जयंत पाटलांना हवे असलेले जलसंपदा खाते सोडायला नकार दिला आणि तिथेच जयंत पाटलांच्या महायुतीतल्या प्रवेशावर खटकी पडली. आपल्याला हवे ते मंत्रिपद मिळणार नसेल, तर महायुतीत प्रवेश करण्यात मतलब नाही, असे जयंत पाटलांना वाटले आणि त्यांनी शरद पवारांचीच साथ द्यायचे ठरविले, अशी त्यावेळी चर्चा होती. ती आजपर्यंत तरी खरी ठरली आहे.
याचा अर्थ जयंत पाटलांना केवळ मर्जीतले खाते दिले नाही म्हणून जयंत पाटील महायुतीकडे गेले नाहीत आणि ते पवारांबरोबर राहिले. ज्या क्षणी महायुतीतले नेते जयंत पाटलांच्या मर्जीचे खाते त्यांना देतील, त्या क्षणी ते पवारांकडे राहतील का?? हा कळीचा सवाल आहे. राजकारणात 60 पेक्षा जास्त वर्ष अनुभव घेतलेल्या पवारांना जयंत पाटलांचे “हे” “राजकारण” समजत नाही, असे इतरांनी समजण्याचे कारण नाही. त्यामुळे महायुतीच्या उंबरठ्यावर जाताजाता राहिलेल्या जयंत पाटलांकडे पवार मुख्यमंत्रीपदासारखे मोठे पद सोपवतील का?? हा खरा सवाल आहे.
त्याचबरोबर पवारांनी सुरुवातीला रोहित पवारांचे नाव समोर आणले होते. नंतर त्यांनी जयंत पाटलांचे नाव समोर आणले. ही दोन्ही नावे राष्ट्रवादीतली “बफर” नावे आहेत, असे राजकीय वर्तुळात मानले जात आहे. कारण पवारांच्या मनातल्या मुख्यमंत्र्याचे नाव सुप्रिया सुळे यांचे आहे. पण त्यांचे नाव उघडपणे समोर आणले, तर त्या नावाविरोधात महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय पक्षांमधले मोठे घटक मैदानात येतील आणि सुप्रिया सुळे यांचे नाव गारद होईल ही भीती पवारांना वाटते म्हणूनच ते सुप्रिया सुळेंचे नाव उघडपणे समोर आणायची हिंमत करत नाहीत, असे पवारांचे समर्थक बोलत असतात.
ते काहीही असले तरी सुधाकरराव नाईक प्रकरणाचा जुना अनुभव आणि महायुतीने मर्जीतले जलसंपदा खात्याचे मंत्रीपद दिले नाही म्हणून केवळ पवारांबरोबरच राहिलेल्या जयंत पाटलांना पवार मोठे पद देतील का??, याविषयी दाट संशय आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App