विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेस कार्यकारिणीच्या आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपण 2022 सप्टेंबरपर्यंत अध्यक्ष राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्याचवेळी त्यांनी जी 23 नेत्यांचे नाव न घेता मीडियातून आपल्याशी कोणी बोलू नये, असा इशारा दिला.will it strengthen the party? Discipline is important: Congress leader & Rajasthan Min Raghu Sharma on Kapil Sibal
सोनिया सोनिया गांधी यांनी जी 23 गटातील नेत्यांना हा इशारा दिला असला तरी काँग्रेसचे बाकीचे नेते मात्र उघडपणे मीडियात बोलताना दिसत आहेत. कपिल सिब्बल यांनी मध्यंतरी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना उद्देशून जाहीरपणे काही सल्ले दिले होते. त्यावर राजस्थानचे मंत्री आणि काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य रघु शर्मा यांनी आज तीव्र आक्षेप घेतला. काँग्रेसचे सर्व नेते सोनिया गांधी यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. सोनिया गांधी घेतील तो निर्णय काँग्रेसच्या सर्व नेत्यांना मान्य आहे, असे असताना कोणी मीडियातून बोलणे कितपत योग्य आहे? असा सवाल रघु शर्मा यांनी मीडियाशीच बोलून केला.
Do such talks strengthen Congress? If you hold press conference on your own&say outside the things that you should say before the leadership, will it strengthen the party? Discipline is important: Congress leader & Rajasthan Min Raghu Sharma on Kapil Sibal after CWC meet in Delhi pic.twitter.com/U4tmoLCrvx — ANI (@ANI) October 16, 2021
Do such talks strengthen Congress? If you hold press conference on your own&say outside the things that you should say before the leadership, will it strengthen the party? Discipline is important: Congress leader & Rajasthan Min Raghu Sharma on Kapil Sibal after CWC meet in Delhi pic.twitter.com/U4tmoLCrvx
— ANI (@ANI) October 16, 2021
सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाला कोणीही आव्हान दिले नाही, असा खुलासा गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत केला होता. त्याची बातमी एएनआय या वृत्तसंस्थेने दिली.
काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत जी 23 नेत्यांच्या नावाचा उल्लेख देखील झाला नाही, अशी माहिती बैठक संपल्यानंतर अंबिका सोनी यांनी पत्रकारांना दिली.
मूळ म्हणजे आजची काँग्रेस कार्यकारिणी बैठकीची सर्व राजकीय मशक्कत जी 23 नेत्यांनी आवाज उठविल्यानंतर करण्यात आली होती. परंतु सोनिया गांधी यांनी आपल्या सुरुवातीच्याच भाषणात आणि लेखी निवेदनात काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत मनमोकळी चर्चा जरूर व्हावी. परंतु, ती या चार भिंतीतच राहावी. बाहेर जाताना आपले एकमतच असले पाहिजे. काँग्रेस कार्यकारिणीने एक मताने निर्णय घेतले पाहिजेत, असा इशारा दिला होता.
हा इशारा आत्तापर्यंत जी 23 च्या नेत्यांनी पाळलेला दिसला. त्यातही गुलाम नबी आझाद यांनी सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाला कोणीही आव्हान दिले नसल्याचे स्पष्ट केल्याने जी 23 गटाचे नेते सोनिया गांधी यांच्या सूचनेनुसार संयम आणि पक्षाची शिस्त पाळताना दिसले. परंतु बाकीचे काँग्रेस नेते मात्र रघु शर्मा यांच्या रूपाने बाहेर उघडपणे जी 23 गटाच्या नेत्यांच्या विरोधात बोलताना दिसले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App