Sharad pawar : आकड्यांच्या खेचाखेचीत काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार, तर “सध्याच्या” महाविकास आघाडीसाठी पवार किती बळ वापरणार??

sharad pawar

नाशिक : महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांच्या जागावाटपात आकड्यांच्या खेचाखेचीत काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार, तर विद्यमान रचनेतली महाविकास आघाडी निवडून आणण्यासाठी शरद पवार आपले बळ किती वापरणार??, असा गंभीर सवाल तयार झाला आहे. यावर मराठी माध्यमांनी चकार शब्दही काढलेला नाही.

लोकसभा निवडणुकीत चांगला परफॉर्मन्स दाखवू शकलेल्या महाविकास आघाडीचे मनोधैर्य चांगलेच उंचावले, पण त्यातून महाविकास आघाडी एकजूट आणि एकजीव होण्यापेक्षा सत्तेसाठी आणि मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये स्पर्धाच वाढली. जागावाटपाच्या खेचाखेचीत भर पडली. कधी काँग्रेस 125, शिवसेना 115, राष्ट्रवादी 88; तर कधी शिवसेना 95, काँग्रेसचे 115 राष्ट्रवादी 100 असे आकडे माध्यमांमधून “पेरले” जाऊ लागले. काँग्रेसने जास्त जागा लढवल्या तरी चालतील. शिवसेना कमी जागा लढवेल, पण मुख्यमंत्रीपद मिळाले पाहिजे, अशा बातम्यांचे पतंग हवेत उडाले. पण यापैकी कुठल्याच बातम्यांना महाविकास आघाडीच्या कुठल्याच वरिष्ठ नेत्यांनी दुजोरा कधीच दिला नाही.



पण मुख्यमंत्री पदाबाबत मात्र काँग्रेस आणि शिवसेना कमालीचे आग्रही राहिले. दोघांच्या रस्सीखेचीतून शरद पवारांनी राष्ट्रवादीचे अंग बाजूला काढून घेतले. राष्ट्रवादी काँग्रेस कडून मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत कुणीही नाही, असे पवारांनी जाहीर करून टाकले.

काँग्रेसच्या मुंबईतल्या नेत्या खासदार वर्षा गायकवाड यांनी सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरे यांची नावे घेऊन महिला मुख्यमंत्रीपदाची हॅट रिंग मध्ये टाकली. पण काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडी सत्तेवर आल्यावर काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार असे सांगून सगळ्यांनाच झटका दिला.

– काँग्रेसचा वरचष्मा

वर्षा गायकवाड यांच्यापेक्षा बाळासाहेब थोरात यांचे स्थान काँग्रेस मध्ये वरचे आहे. खुद्द ते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत, इतकेच नाही तर लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ते जवळचे नेते आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीपदा संदर्भात त्यांनी केलेल्या वक्तव्याला महाराष्ट्रात सगळ्यात जास्त वजन आहे. शिवाय लोकसभा निवडणुकीतील परफॉर्मन्समुळे काँग्रेस महाराष्ट्रातला नंबर 1 चा पक्ष बनला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतल्या सगळ्याच वाटाघाटींमध्ये काँग्रेसचाच वरचष्मा राहणार आहे.

सध्याची महाविकास आघाडी आणि पूर्वीची काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी यांचा थोडा इतिहास पाहिला आणि काँग्रेस शरद पवार यांच्यातले विशिष्ट राजकीय संबंध पाहून त्याचा आढावा घेतला, तर काँग्रेसचा मुख्यमंत्री कायमच पवारांना “जड” गेला आहे. काँग्रेसने शक्यतो पवारांच्या इच्छेविरोधातलाच मुख्यमंत्री आत्तापर्यंत महाराष्ट्रात नेमला आहे विलासराव देशमुख अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण हे पवारांच्या मनातले मुख्यमंत्री नव्हते, तर पवार पवारांच्या गोटाच्या विरोधातले नेते होते.

2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत काँग्रेसचाच वरचष्मा राहणार असेल, परिणाम स्वरूप काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार असेल तर विद्यमान महाविकास आघाडी निवडून आणण्यासाठी शरद पवार तरी आपले किती बळ वापरतील??, हा खरा सवाल आहे. इकडे आपली आमदारांची संख्या वाढवून दुसरीकडे नव्या महाविकास आघाडीचे रचनेकडेच पवार लक्ष देण्याची दाट शक्यता असल्याचे मुंबईपासून दिल्लीपर्यंतच्या राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

मुख्यमंत्री शिंदे – पवार भेटीगाठी

पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आतापर्यंत घेतलेल्या भेटीसाठी वेगवेगळ्या कारणांसाठी दाखवायला असल्या, तरी प्रत्यक्षात त्या भेटीगाठी विधानसभा निवडणुकीनंतरच्या कुठल्यातरी वेगळ्याच आघाडीची तयारी करण्यासाठी घेतल्याच्या अटकळी आधीच बांधल्या गेल्या आहेत. पवारांच्या राजकारणाची अडीच घरी किंवा तिरकीचा लक्षात घेता त्यात तथ्यांश निश्चितच अधिक आहे. विद्यमान रचनेतल्या महाविकास आघाडीत (म्हणजे काँग्रेस उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस) काँग्रेसचा वरचष्मा निर्माण होणे आणि त्यातून काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणे हे पवारांना परवडणार नसल्याने ते संपूर्ण महाविकास आघाडी निवडून आणण्यासाठी आपले किती बळ वापरतील??, याविषयी दाट शंका त्यामुळेच निर्माण झाली आहे.

Why sharad pawar will use his energy to make Congress chief minister in maharashtra??

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात