कोई सरहद ना इन्हें रोके… जेव्हा ठरते माणुसकी श्रेष्ठ, तेव्हा अध्यक्षीय घोषणेला अपवाद करून दिला जातो औरंगाबादच्या देशमुख कुटुंबीयांना अमेरिकेत प्रवेश


विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : कोरोनाच्या दुसरया लाटेत भारतीयांना अमेरिकेत प्रवेश नाकारण्याचा निर्णय घेतला होता. तशी अध्यक्षीय घोषणा (प्रेसिडेंट प्रोक्लेमेशन १०९९९) झाली होती. पण या अध्यक्षीय घोषणेला अपवाद (नॅशनल इंटरेस्ट एक्सेप्शन) करीत अमेरिकी दूतावासाने औरंगाबादच्या देशमुख कुटुंबीयांना अमेरिकेत येण्यासाठी हिरवा कंदील दाखविला आहे. कोविडची बंधने, आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध आणि अमेरिकेत प्रवासाला ‘नो एंट्री’ एवढ्या सगळ्या अडचणींवर माणुसकीच्या संवेदनशीलतेने मात केली आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव व औरंगाबादच्या माजी महापौर विजया रहाटकर यांनी यामध्ये खारीचा वाटा उचलला. When Aurangabad couple got rare exception to enter into US for humanitarian purpose

ज्यांच्यासाठी अपवाद केला गेला, ते आहेत औरंगाबादचे डाॅ. रत्नदीप देशमुख आणि त्यांच्या पत्नी वंदना देशमुख. वंदना देशमुख यांच्या बहीण श्रीमती सुनीता राजेंद्र पाॅल या अमेरिकेत सिएटल येथे राहतात. देशमुख यांचा मुलगा अजयदेखील अमेरिकेत असतो; पण तो सांता क्लारा (कॅलिफोर्निया) येथे राहतो. सुनीता पाॅल या एकट्याच राहतात.



मध्यंतरी त्यांना एका जीवघेण्या रोगाचे निदान झाले आणि आता त्या आजाराच्या “लास्ट स्टेज”मध्ये आहेत. तसे रीतसर वैद्यकीय प्रमाणपत्र अमेरिकेतील रूग्णालयाने दिले आहे. अशावेळेच्या त्यांच्या सुशुश्रेसाठी आणि कदाचित आयुष्याच्या अंतिम क्षणी जवळ राहण्यासाठी देशुमख कुटुंबीयांना अमेरिकेत जायचे होते. त्यांच्याकडे पात्र व्हिसा होताच; पण कोरोनाच्या दुसरया लाटेत अध्यक्षीय घोषणेद्वारे भारतीयांना अमेरिकेत प्रवेश करण्यास मज्जाव केला गेला आणि देशमुख कुटुंबीयांचे अमेरिकेत पोहोचणे जवळपास अशक्यप्राय बनले.

तेव्हा डाॅ. रत्नदीप देशमुख हे भाजपच्या राष्ट्रीय सचिव असलेल्या विजया रहाटकरांना भेटले. रहाटकरांनी मुंबईतील अमेरिकेचे वाणिज्य दूत (कौन्सुलेट जनरल) डेव्हिड रांन्झ यांच्याशी संपर्क साधला आणि त्यातून मार्ग सापडत गेला. त्यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे देशमुख यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दिल्लीस्थित दूतावासाला केला आणि बघता बघता फक्त दहा दिवसांच्या आतच देशमुख कुटुंबीयांना ‘नॅशनल इंटरेस्ट एक्सेप्शन’ असे जाहीर करत अमेरिकेत प्रवेशाची परवानी दिली. अर्थातच दोन्ही लसींचे प्रमाणपत्र, निगेटिव्ह आरटीपीसीआर आदींची पूर्तता करण्याची अट घातली. सुदैवाने दोघांनीही लसींचे दोन्ही डोस घेतलेले आहेत.
अमेरिकी दूतावासाने दाखवलेल्या संवेदनशीलतामुळे आणि थेट अध्यक्षीय घोषणेला अपवाद करण्याच्या निर्णयामुळे वंदना देशमुख या रूग्णशय्येवर मृत्यूशी दोन हात करीत असलेल्या आपल्या एकट्या पडलेल्या बहिणीला भेटू शकणार आहेत.

When Aurangabad couple got rare exception to enter into US for humanitarian purpose

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात