वनवासी विकासासाठी ‘स्टफ फॉर गुड हेल्थ’; सेंद्रीय भाज्या, फळे उत्पादनासाठी वनवासी बांधवांना प्रोत्साहन, रोजगार

प्रतिनिधी

मुंबई – वनवासींच्या विकासासाठी भारत विकास परिषदेच्या माध्यमातून ‘स्टफ फॉर गुड हेल्थ’ हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. भारतीय पारंपरिक सेंद्रीय कृषीपद्धतीचा वापर करून वनवासी बांधवांच्या माध्यमातून भाज्या फळे उत्पादन या प्रकल्पांतर्गत केले जात असून संपूर्ण मुंबईत या भाज्यांचे घरपोच वितरण केले जाते. विश्व संवाद केंद्राच्या मुंबई शाखेने ही माहिती दिली आहे. vanvasi development program, stuff for good health in mumbai

उत्तम आरोग्याच्या दृष्टीकोनातून आजही अनेकजण पारंपरिक भारतीय शेतीपद्धतीनुसार सेंद्रीय पद्धतीने पिके घेताना दिसतात. आत्मनिर्भर भारत प्रकल्पांतर्गत वनवासींचा सर्वांगीण विकास करण्यासाठी हीच पद्धती का अवलंबू नये या विचारातून भारत विकास परिषदेच्या मुंबई प्रांत समर्पण शाखेने ‘स्टफ फॉर गुड हेल्थ’ – सेंद्रीय भाज्या आणि फळे हा प्रकल्प सुरू केला.

वानगाव, डहाणू, सफाळे आणि कोसबाड नजीकच्या वनवासी नागरिकांच्या माध्यमातून हे भाजीउत्पादन केले जाते. सुमारे १० शेतकरी आणि ५० शेतमजूर हे या प्रकल्पाच्या निमित्ताने संस्थेशी जोडले गेले आहेत.वनवासी समाज आर्थिक दृष्ट्या मागासलेला असेल तर त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत हे लक्षात घेऊन यापूर्वी संस्थेच्या माध्यमातून वनवासींच्या विकासासाठी घोडीपाडा येथे कुक्कुटपालन आणि शिलाईमशीन अशी मदत करण्यात आली आहे. आता शेतकरी आणि शेतमजूर यांना डोळ्यासमोर ठेवून हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. सध्या ७५ हून अधिक स्त्रीपुरुषांना या प्रकल्पातून रोजगार मिळाला आहे. मुंबईत अनेक ठिकाणी भाज्या – फळे उपलब्ध करून दिली जात आहेत. या सेंद्रीय भाज्या व्हॉट्स अप (8591226652) आणि वेबसाईटच्या (https://d-stuffforgoodhealth780.dotpe.in) बुकिंगच्या माध्यमातून खरेदी करता येणार आहेत.

vanvasi development program, stuff for good health in mumbai

 

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*