मराठा आरक्षणाचा निकाल न्यायालयात प्रलंबित असल्याचे कारण देत उद्धव ठाकरे-अजित पवार सरकारकडून स्पर्धा परीक्षांच्या वेळापत्रक पाळले गेले नव्हते. यामुळे महाराष्ट्रातील चार-पाच लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर आतातरी स्पर्धा परीक्षेंसंदर्भात राज्य सरकारने सकारात्मक पाऊल उचलावे अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. Uddhav-Ajit Government should announce the MPSC examination schedule
विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (एमपीएससी)मार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परिक्षांचे रखडलेले वेळापत्रक उद्धव ठाकरे-अजित पवार सरकारने आतातरी जाहीर करावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याचे सांगत या परिक्षा रखडवण्यात आल्या होत्या. त्यामुळे या परिक्षांचा अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आणि निराशेची भावना निर्माण झाली होती.
मराठा आरक्षणाचा मुद्दा आता निकाली निघाल्याने राज्य सरकारने त्वरीत निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे. राज्य सरकारच्या वेगवेगळ्या खात्यांमधील रिक्त पदांच्या भरतीसाठीचे मागणीपत्र एमपीएससीला पाठविले जाते. त्यानंतर एमपीएससीमार्फत वेळापत्रकानुसार जाहिरात प्रसिध्द करून भरती प्रक्रिया राबवण्यात येते. सरकारने गेल्या दीड वर्षात या भरतीसंदर्भातले मागणीपत्र पाठविले नव्हते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने मागणीपत्र पाठवून एमपीएससीला परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यास सांगावे, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
एमपीएससीच्या भोंगळ कारभारामुळे मुळातच विद्यार्थी वैतागले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून एमपीएससी तसेच सरळ सेवा भरती प्रक्रिया झालेली नाही. जी भरती प्रक्रिया राबवण्यात आली ती आरक्षण, न्यायालयातील दावे, तसेच कोरोना महामारी अशी कारणे देत रखडवण्यात आली. आता मात्र सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा विचार करून भरती प्रक्रिया राबवावी. विविध खात्यांमधल्या रिक्त जागांची माहिती घेऊन भरती करण्यासाठी ठाकरे-पवार सरकारने एमपीएससीला मागणीपत्र पाठवावे. तरच लाखो विद्यार्थ्यांच्या कष्टाचे चीज होईल, अन्यथा गेल्या अनेक वर्षांची त्यांचे स्वप्न धुळीस मिळेल, अशी चिंता विद्यार्थी व्यक्त करत आहेत.
स्पर्धा परीक्षेसाठी पदवीनंतर लाखो विद्यार्थी प्रयत्न करतात. यात प्रामुख्याने ग्रामीण भागातील, शेतकरी कुटुंबांमधल्या बहुजन विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी वय वर्षे २१ ते ३० या गटातील तरुण प्रयत्न करतात. घरची आर्थिक स्थिती नाजूक असतानाही या परीक्षेसाठी तन-मन-धनाने विद्यार्थी कष्ट करतात. मात्र परीक्षाच वेळेत न होणे, भरती प्रक्रिया रखडणे, नियुक्त्या वेळेत न होणे यामुळे सामाजिक, आर्थिक तसेच मानसिक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. नैराश्य आणि तणावामुळे काही विद्यार्थ्यांना जीवही गमवावा लागला आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने तातडीने २०२१च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करावे, अशी आग्रही मागणी विद्यार्थी करत आहेत.
Uddhav-Ajit Government should announce the MPSC examination schedule
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App