विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : भारताच्या लसीकरण मोहीमेचे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेटस यांनी कौतुक केले आहे. जबरदस्त माईलस्टोन असे म्हणत गेटस यांनी पंतप्रधान कार्यालयाला टॅग केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. सरकार, संशोधन आणि विकास (आर अँड डी) क्षेत्रातील शास्त्रज्ञ , लस उत्पादक आणि सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळेच हा पराक्रम शक्य झाला असल्याचे गेटस यांनी म्हटले आहे. Tremendous milestone, Bill Gates lauded India’s prowess in vaccination campaign
भारताने एका दिवसात १ कोटी कोरोनाप्रतिबंधक लसीकरण केले. आत्तापर्यंतच्या लसीकरणातील हा विक्रम आहे. गेटस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की जबरदस्त, अभिनंदन भारत, लसीकरणातील मैलाचा दगड गाठल्याबद्दल असे म्हणत गेट्स यांनी ट्विटमध्ये लसीकरणाची एक बातमी शेअर केली आहे. गेट्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या ट्विटर हँडललाही टॅग केले आहे.
भारतात शुक्रवारी एकूण एक कोटी ६४ हजार ३७६ लसीचे डोस दिले गेले. एका दिवसातील लसीकरणाचा हा विक्रम आहे. यापूर्वी १६ आॅगस्ट रोजी ८८ लाख २० हजार जणांना लस देण्यात आली आहे. भारतामध्ये १६ जानेवारी रोजी लसीकरण कार्यक्रमाला सुरूवात झाली. तेव्हापासूनचे हे सर्वाधिक लसीकरण आहे. भारताच्या वैज्ञानिक क्षेत्रातील नाविन्यपूर्णता आणि कोरोना लसीच्या उत्पादनाच्या क्षमतेतील नेतृत्व प्रशंसनीय आहे. जग कोरोना विषाणू संसर्गाविरुद्ध लढतंय त्यावेळी भारतात कोरोना लसीकरणाची प्रक्रिया सुरु होतेय, हे पाहताना आनंद होत असल्याचे गेटस यांनी म्हटले आहे.
भारत सरकारच्या ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑ फ इंडियानं सीरम इनस्टिट्यूटच्या कोविशिल्ड, भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि झायडस कॅडिलाच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमात बोलताना भारत लवकरच जगातील सर्वात मोठ्या लसीकरण कार्यक्रमाला सुरुवात करणार असल्याचं सांगितले होते. याबाबतची बातमी शेअर करत बिल गेटस यांनी भारताचं कौतुक केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App