भगत सिंग, उधम सिंग यांच्यासारख्या क्रांतिकारकांना आणि असंख्य देशप्रेमींना प्रेरणा देणारे जालियानबाग स्मारक देशाला समर्पित


वृत्तसंस्था

नवी दिल्ली – प्रख्यात क्रांतिकारक शहीद भगत सिंग आणि शहीद उधम सिंग यांच्या सारख्या अनेक क्रांतिकारकांना ज्या बलिदानातून आत्मबलिदानाची प्रेरणा मिळाली, त्या जालियानवाला बागेचे स्मारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला समर्पित केले. jallianwala Bagh is the place that gave courage to an innumerable number of revolutionaries like Sardar Udham Singh and Bhagat Singh

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनी पंतप्रधानांकडे शहीद उधमसिंग यांचे पिस्तुल आणि डायरी ब्रिटिशांच्या ताब्यातून भारतात परत आणण्याची मागणी केली. याबाबत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहिल्याची आठवण अमरिंदर सिंग यांनी करून दिली.

शहीद उधम सिंग यांनी मायकल ओ डायर या जालिवायनवाला बागेत निशःस्त्र भारतीयांचे हत्याकांड करणाऱ्या ब्रिटिश जुलमी अधिकाऱ्याला लंडनमध्ये भर कार्यक्रमात गोळ्या घालून मारले होते. जालियानवाला हत्याकांडाचा सूड घेतला होता. त्या शहीद उधम सिंग यांचे पिस्तुल आणि डायरी आजही ब्रिटिशांच्या ताब्यात आहे. या ऐतिहासिक महत्त्वाच्या वस्तू भारतात परत आणण्याची मागणी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मागणीला अनुकूलता दर्शविली आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आदिवासींच्या योदगदानाचाही पंतप्रधानांनी उचित शब्दांमध्ये गौरव केला. शूर आदिवासी स्वातंत्र्य योध्द्यांच्या स्मरणार्थ देशाच्या ९ राज्यांमध्ये स्मारके उभारण्याचे काम जोरात सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ही सर्व स्मारके पूर्ण करून देशाला समर्पित होणे अपेक्षित आहे.

jallianwala Bagh is the place that gave courage to an innumerable number of revolutionaries like Sardar Udham Singh and Bhagat Singh

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती