लोकमान्यांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाने दिली राष्ट्रीय आणि सामाजिक जीवनाला सांस्कृतिक श्रीमंती…!!


सार्वजनिक गणेशोत्सवाने असंख्य कलावंतांना आपल्या पहिल्या कलाविष्कार मान श्री गजाननाच्या चरणी अर्पण करण्याची संधी दिली. सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास लिहिताना अनेक मोठ्या इतिहासकारांनी आणि विचारवंतांनी त्याच्या राजकीय आणि सामाजिक पैलूंकडे जरूर लक्ष दिले, पण सार्वजनिक गणेशोत्सव आणि त्या अनुषंगाने का होईना पण निर्माण केलेला हा महत्त्वाचा सांस्कृतिक पैलू महाराष्ट्राची आणि लोकमान्यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव गणेशोत्सवाची आगळी महती सांगून जातो. हे लक्षात घेतले पाहिजे…!! The national and social work in the public Ganeshotsav started by Lokmanya Tilak is definitely big


लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवामधील राष्ट्रीय आणि सामाजिक कार्य निश्चित मोठे आहे, पण त्यातून सुरूवातीला नकळत घडलेले संस्कृती कार्य सांस्कृतिक कार्य इतके मोठे आहे की त्याने संपूर्ण महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे सांस्कृतिक जीवनच जणू व्यापून टाकले आहे. किंबहुना व्यापून उरले आहे, असे म्हणणे उचित ठरेल.

सार्वजनिक गणेशोत्सवाने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात क्रांती आणली पण त्याहीपेक्षा सांस्कृतिक जीवनात गणेशोत्सवाने आणलेली क्रांती कितीतरी दूरगामी आणि खोलवर रुजलेली आहे. हे नेमकेपणाने लक्षात घेतले पाहिजे.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात जेवढे म्हणून महान कलावंत गाजले त्या प्रत्येकाच्या कलेची मुळे कुठे ना कुठे तरी लोकमान्यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेश उत्सवामध्ये रुजलेली दिसतात. महाराष्ट्रातला प्रत्येक छोटा मोठा कलावंत हा सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मांडवाखालून गेलाच आहे. गीत रामायणकार महाकवी ग. दि. माडगूळकर यांच्यापासून ते राम अर्थात सुधीर फडके यांच्यापर्यंत आणि शास्त्रीय गायन आतला तेजस्वी तारा गानहिरा हिराबाई बडोदेकर यांच्यापासून ते संजीव अभ्यंकर यांच्यापर्यंत प्रत्येक कलावंताने आपल्याला कलेची सुरूवात केव्हा ना केव्हा तरी सार्वजनिक गणेशोत्सवातून केली आहे. किंबहुना महिलांनी शास्त्रीय गायनाची मैफल जाहीर समारंभात करण्याची सुरुवात गानहिरा हिराबाई बडोदेकर यांनी पुण्याचा मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपती मंडळाच्या मंडपात 1925 मध्ये केली आहे. एक प्रकारे महिला कलावंतांसाठी हे हिराबाईंनी टाकलेले पहिले क्रांतिकारक पाऊल मानले पाहिजे.



महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशातल्या महिलांच्या औद्योगिक प्रदर्शनाची सुरुवात सार्वजनिक गणेशोत्सवात झालेली आहे न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी श्रीमती रमाबाई रानडे यांच्या पुढाकारातून सन 1898 मध्ये महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन पुण्याच्या सार्वजिनक गणेशोत्सवात भरवण्यात आले होते. त्यावेळी या प्रदर्शनात 50 स्टॉलमध्ये महिलांनी केलेल्या वस्तू प्रदर्शित करण्यात आल्या होत्या.

सार्वजनिक गणेशोत्सवाचा वापर चित्रकला यांसारख्या कलांसाठी करून घेतला पाहिजे असे मत 1916 मध्ये पु. ल. देशपांडे यांचे आजोबा ऋग्वेदी यांनी मांडले होते. त्यांनी चित्रकारांच्या कलाकृतींना सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपात मानाचे स्थान मिळवून दिले होते. अशा एक नव्हे तर अनेक नोंदीनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या इतिहासात मानाचे स्थान मिळवले आहे. किंबहुना कला देवतेच्या आराधनेत कलावंतांची कला विविध प्रकारे उजळून निघाल्याचे दिसते.

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या मते लोकमान्यांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाने जेवढे राष्ट्रीय आणि सामाजिक कार्य केले त्यापेक्षाही महत्तम कार्य सांस्कृतिक क्षेत्रात केले. पुलंच्या मते सार्वजनिक गणेशोत्सवाने महाराष्ट्राची संस्कृती उंची एवढी वाढवली की तिने गगन भेदले.

सार्वजनिक गणेशोत्सवाने असंख्य कलावंतांना आपल्या पहिल्या कलाविष्कार मान श्री गजाननाच्या चरणी अर्पण करण्याची संधी दिली. सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास लिहिताना अनेक मोठ्या इतिहासकारांनी आणि विचारवंतांनी त्याच्या राजकीय आणि सामाजिक पैलूंकडे जरूर लक्ष दिले, पण सार्वजनिक गणेशोत्सव आणि त्या अनुषंगाने का होईना पण निर्माण केलेला हा महत्त्वाचा सांस्कृतिक पैलू महाराष्ट्राची आणि लोकमान्यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव गणेशोत्सवाची आगळी महती सांगून जातो. हे लक्षात घेतले पाहिजे…!!

The national and social work in the public Ganeshotsav started by Lokmanya Tilak is definitely big

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात