त्वदीयाय कार्याय बद्धा कटीयम्! संघ स्वयंसेवकांची कमाल;२० वर्षांपासून बंद रुग्णालयाचा कायापालट करून १५ दिवसांत उभारलं कोविड सेंटर


कन्नड सुपरस्टार यश याच्या केजीएफ म्हणजे कोलार गोल्ड फिल्ड या चित्रपटात सोन्याच्या खाणीत काम करणाऱ्या कामगारांच्या हालअपेष्ठा दाखविल्या आहेत. परंतु, याच केजीएफमध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन येथील रुग्णालयाचे रुपडे पालटले आहे. बंद पडलेल्या रुग्णालयात सुमारे तीनशे रुग्ण आता उपचार घेत आहेत. The hospital in Kolar Gold Field has been transformed


प्रतिनिधी

कोलार : कन्नड सुपरस्टार यश याच्या केजीएफ म्हणजे कोलार गोल्ड फिल्ड या चित्रपटात सोन्याच्या खाणीत काम करणाºया कामगारांच्या हालअपेष्ठा दाखविल्या आहेत. परंतु, याच केजीएफमध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन येथील रुग्णालयाचे रुपडे पालटले आहे. बंद पडलेल्या रुग्णालयात सुमारे तीनशे रुग्ण आता उपचार घेत आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशाती आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडला आहे. रुग्णालयांमध्ये बेड शिल्लक नाहीत. त्यामुळे विविध संघटना मदतीसाठी पुढे येत आहेत. कर्नाटकातील कोलार येथील गोल्ड फिल्ड येथे एक रुग्णालय बंद पडले होते. आरएसएस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी मिळून गेल्या २० वर्षांपासून बंद असलेले रुग्णालय सुरू केले. या बंद पडलेल्या रुग्णालयाची अवघ्या 15 दिवसांत डागडुजी केली आहे.हे कोविड सेंटर बंगळुरुपासून 100 किमी दूर असून त्याच्या उभारणीमागची गोष्ट मोठी रंजक आहे. या कोविड सेंटरसाठी जवळपास 300 स्वयंसेवकांनी मेहनत घेतली. कोलार जिल्ह्याचे भाजपचे खासदार एस. मुनीस्वामी म्हणाले, कोलार येथील भारत गोल्ड माईन लिमीटेड हॉस्पीटल तसे खूप जुने आहे. या रुग्णालयामध्ये खाणीमध्ये काम करणाऱ्यांवर उपचार केले जायचे.

मात्र, नंतर हे रुग्णालय 2001 मध्ये बंद पडले. सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे भाजपच्या शहराध्यक्षांनी या रुग्णालयाच्या जुन्या इमारतीचे कोविड सेंटरमध्ये रुपांतर करण्याविषयी कल्पना दिली. त्यांतर आम्ही कामाला लागलो. या हॉस्पिटलवर यापूर्वी 1200 लोक अवलंबून होते. या रुग्णालयात 800 बेड्स होते. मात्र, हे रुग्णालय 2001 साली बंद पडले.

सध्या बेड्स कमी पडत असल्यामुळे आमच्या संघ परिवाराने याच ठिकाणी 300 रुग्णांवर उपचार करता येईल, असे कोविड सेंटर उभे करण्याचे ठरवले. त्यासाठी जवळपास 250 लोकांनी दिवसरात्र काम केले. त्यानंतर न थकता काम केल्यामुळे अवघ्या 15 दिवसांमध्ये येते कोविड सेंटर उभे आहे. या ठिकाणी एकाच वेळी 220 रुग्णांवर उपचार केले जाऊ शकतात. हे कोविड सेंटर येत्या सोमवारी सुरु होईल.

The hospital in Kolar Gold Field has been transformed

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण