छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांच्या हल्यात जखमी झालेल्या आपल्या सहकाऱ्याला वाचविण्यासाठी आपल्या धार्मिकतेचे मानचिन्ह असलेली पगडी काढून जखमा बांधत प्राण वाचविणाऱ्या कमांडोचा पगडी घालूनच सन्मान करण्यात आला. The honor of the commando who saves the life of a colleague by removing the turban is honored
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांच्या हल्यात जखमी झालेल्या आपल्या सहकाऱ्या ला वाचविण्यासाठी आपल्या धार्मिकतेचे मानचिन्ह असलेली पगडी काढून जखमा बांधत प्राण वाचविणाऱ्या कमांडोचा पगडी घालूनच सन्मान करण्यात आला.
छत्तीसगडमधील बिजापूरजवळील जंगलात नक्षलवाद्यांशी केलेल्या हल्यावेळी जवानांनी शौर्याची पराकाष्टा केली. त्याचबरोबर या संकटाच्या काळात माणुसकीची अनेक उदाहरणेही समोर आली. यातीलच एक अनोखे उदाहरण म्हणजे बलराज सिंग. आपले सहकारी अभिषेक पांडे यांच्यासोबत ते नक्षलवाद्यांशी लढत होते. हल्यात पांडे जखमी झाल्यावर बलराज सिंग यांनी आपली पगडी काढली आणि त्यांच्या जखमा बांधून रक्तस्त्राव थांबविला. यामुळे पांडे यांचे प्राण वाचले.
रायपूर येथील रुग्णालयात गोळी लागल्याने बलराज सिंग यांच्यावर उपचार सुरू आहेत. यावेळी विशेष पोलीस महानिरिक्षक रविंद्र कुमार वीज यांनी त्यांची भेट घेतली. त्यांना पगडी परिधान करून त्यांचा सन्मान केला.
वीज यांनी हा फोटो ट्विट करताना म्हटले आहे की संकटकाळातही हा एक आनंदाचा क्षण आहे. पगडी परिधान केल्यावर बलराज सिंह यांना खूप आनंद झाला होता.
इतर बातम्या वाचा…
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App