वृत्तसंस्था
मुंबई : कोट्यवधी मराठी रयतेचा मानबिंदू असलेला किल्ले रायगड उद्यापासून पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने दुमदुमून जाणार आहे. कारण स्वराज्याची राजधानी रायगड तसेच थंड हवेचे ठिकाण माथेरान तब्बल तीन महिन्यांनंतर पर्यटकांना खुले करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. The gates of Raigad Fort, Matheran open to tourists after three months; E-pass Is Must For Tourists
मार्च २०२१ पासून रायगड जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट दाखल झाली. त्यानंतर पर्यटनस्थळे बंद झाली होती. त्यात किल्ले रायगड व माथेरानचा समावेश होता. त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका ब्सला. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर हा ९.७७ एवढा झाला आहे. मात्र अद्यापही तिसऱ्या लाटेचा धोका आहे.त्यामुळे रायगड जिल्हा हा चौथ्या टप्प्यात ठेवला आहे. असे असले तरी जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेले माथेरान आणि किल्ले रायगड काही अटीशर्थीवर खुले करण्यास परवानगी दिली आहे.
माथेरान आणि किल्ले रायगड येथील स्थानिकांचा व्यवसाय हा पर्यटनावर अवलंबून आहे. माथेरान नगर परिषद हद्दीत मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले आहे. किल्ले रायगड खुले करण्याची मागणी शिवप्रेमींकडून केली जात होती. कोरोनामुळे तीन महिन्यांपासून स्थानिक व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले होते. मात्र आता ही दोन्ही ठिकाणे खुली केल्याने पर्यटन पुन्हा बहरणार आहे.
माथेरान, रायगडावर ई पास लागणार
माथेरान आणि किल्ले रायगडावर ई-पासशिवाय येण्यास बंदी आहे. पर्यटनस्थळांवर आलेल्या पर्यटकाला हॉटेलमधील अंतर्गत खेळ, स्विमिंग पुलावर जाण्यास बंदी आहे. मोकळ्या जागेत व्यायाम, सायकलिंग करण्यास परवानगी आहे. पर्यटकांनी आणि हॉटेल व्यावसायिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. उपाहारगृहे ही ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत. हॉटेल अस्थापनातील कर्मचारी याची आरटीपीसीआर तपासणी करणे अनिवार्य आहे. अन्यथा प्रत्येकी एक हजार रुपये आहे. पर्यटकांच थर्मल स्कॅनिंग तसेच त्यांची नोंद करणे गरजेचे आहे, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App