ठाकरे बंधूंच्या मुलाखतींवर उतारा; देवेंद्र फडणवीसांचा तर्री पोहा!!

Devendra Fadnavis'

नाशिक : ठाकरे बंधूंच्या मुलाखतींवर उतारा; देवेंद्र फडणवीसांचा तर्री पोहा!!, असेच चित्र माध्यमांमधून तरी समोर आले.Thackeray brothers’ interviews; Devendra Fadnavis’s sarcasm!!

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी फक्त मुंबई आणि ठाणे या दोन शहरांवर लक्ष केंद्रित केले, पण तिथे सुद्धा ठाकरे बंधूंनी रस्त्यावर उतरून प्रचारात भाग घेतला, असे दिसले नाही. त्यांनी मुंबई परिसरात सहा सभांचे नियोजन केले. पण प्रत्यक्षात सभाच घेतल्या नाहीत. ठाकरे बंधू ठाण्यात आणि नाशिक मध्ये सुद्धा एकत्र सभा घेणार, असे जाहीर झाले. पण ते या दोन्ही शहरांमध्ये फिरकले नाहीत. दोघांनी मुंबईत आपापल्या पक्षांच्या काही शाखांना भेटी दिल्या.

– ठाकरे बंधूंच्या मुलाखती

पण त्यापलीकडे जाऊन ठाकरे बंधूंनी फक्त मुलाखती देण्यावर भर दिला. त्यांनी महेश मांजरेकर आणि संजय राऊत यांना मुलाखत दिली त्यानंतर राज ठाकरे एबीपी माझाच्या कट्ट्यावर जाऊन आले. या दोनच मुलाखती माध्यमांनी जोरदार गाजविल्या. जणू काही ठाकरे बंधू प्रचारात रस्त्यावर उतरले आणि त्यांनी मुंबई महाराष्ट्र पासून चोरली जात असताना वाचविले अशी वातावरण निर्मिती मराठी माध्यमांनी केली. परंतु प्रत्यक्षात ना ठाकरे बंधू रस्त्यावर उतरले, ना त्यांनी चोरली जात असलेली मुंबई वाचविली. प्रत्यक्षात घरात बसून मुलाखती देण्याखेरीज दुसरे काही केले नाही.



– फडणवीसांच्या बरोबर तर्री पोहा

त्याउलट देवेंद्र फडणवीस यांनी 29 पैकी 29 महापालिकांच्या परिक्षेत्रांमध्ये जाऊन जाहीर सभा घेतल्या. पण ठाकरे बंधूंच्या मुलाखतींवर सुद्धा त्यांनी व्यवस्थित उतारा काढला. त्यांनी नागपुरात फडणवीसांच्या बरोबर तर्री पोहा, असा कार्यक्रम घेतला. त्या कार्यक्रमात त्यांनी स्पृहा जोशी आणि भारत गणेशपुरे यांच्याकडून आपली मुलाखत घेववली.

– तिघांच्याही सगळ्याच मुलाखती “स्क्रिप्टेड”

संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी ठाकरे बंधूंची घेतलेली मुलाखत जशी “स्क्रिप्टेड” होती, तशीच स्पृहा जोशी आणि भारत गणेशपुरे यांनी फडणवीस यांची “स्क्रिप्टेडच” मुलाखत घेतली. संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी ठाकरे बंधूंना अडचणीत आणणारे कुठलेही प्रश्न विचारले नाहीत त्यामुळे स्पृहा जोशी आणि भारत गणेशपुरे यांनी सुद्धा तर्री पोहे खाताना फडणवीस यांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारले नाहीत. जे काही “अडचणीत” आणणारे प्रश्न आहेत, असे वाटले, त्यांना फडणवीसांनी वकिली थाटात व्यवस्थित उत्तरे दिली. फडणवीस यांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन सुद्धा अशा मुलाखतींचा प्रयोग केला. यामध्ये छत्रपती संभाजी नगर, अहिल्यानगरचा समावेश राहिला.

देवेंद्र फडणवीस यांनी 29 महापालिकांच्या निवडणुकांच्या निमित्ताने सगळा महाराष्ट्र पिंजून काढलाच, पण ठाकरे बंधू “स्क्रिप्टेड” मुलाखतींच्या आधारे वातावरण निर्मिती करत आहेत, हे पाहिल्याबरोबर त्यांनी सुद्धा “स्क्रिप्टेड” मुलाखतींचा तर्री पोहा खाल्ला आणि ठाकरे बंधूंच्या मुलाखतींना व्यवस्थित उतारा दिला.

Thackeray brothers’ interviews; Devendra Fadnavis’s sarcasm!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात