महाराष्ट्रात पोलीस राज , संजय राऊत यांच्यावर छळ करत असल्याचा आरोप करणाऱ्या स्वप्ना पाटकर यांना अटक, डॉक्टरेट बनावट असल्याच्या आरोपावरून घेतले ताब्यात


शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडून आपला छळ होत असल्याचा आरोप करणाऱ्या चित्रपट निर्मात्या डॉ. स्वप्ना पाटकर यांना पोलीसांनी अटक केली आहे. त्यांची डॉक्टरेट पदवी बनावट असल्याचा पोलीसांचा आरोप असून त्यामुळे पोलीस पथकाने घरी जाऊन त्यांना अटक केली. बनावट डॉक्टरेट असणे इतका गंभीर गुन्हा आहे का? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. संजय राऊत यांनीच छळ करण्यासाठी आणखी एक कुभांड रचल्याचा आरोपही करण्यात आला आहे. Swapna Patkar who alleged Sanjay Raut for harrasement arrested on charges of forging doctorate


विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडून आपला छळ होत असल्याचा आरोप करणाऱ्या चित्रपट निर्मात्या डॉ. स्वप्ना पाटकर यांना पोलीसांनी अटक केली आहे. त्यांची डॉक्टरेट पदवी बनावट असल्याचा पोलीसांचा आरोप असून त्यामुळे पोलीस पथकाने घरी जाऊन त्यांना अटक केली. बनावट डॉक्टरेट असणे इतका गंभीर गुन्हा आहे का? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. संजय राऊत यांनीच छळ करण्यासाठी आणखी एक कुभांड रचल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील बाळकडू या चित्रपटाच्या डॉ. स्वप्ना पाटकर निर्मात्या आहेत. ३० मार्च २०२१ रोजी त्यांनी ट्विटरद्वारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर आरोप केले होते. संजय राऊत गेल्या आठ वर्षांपासून शिवसेना पक्षातील त्यांचे स्थान आणि सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत मला धमक्या आणि शिवीगाळ करत आहेत.इतकेच नाही तर माझे कुटुंब, माझा मित्रपरिवार, नातेवाईक यांनाही ते त्रास देत आहेत. काही ना काही आरोप माझ्यावर ठेवत पोलिस स्टेशनला मला चौकशीसाठी बोलावले जात आहे. यामुळे मी खूपच त्रस्त झाले आहे., असा आरोप स्वप्ना पाटकर यांनी केला होता. दोन पानांचे पत्र लिहून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र, राष्ट्रपती भवन, प्रियंका गांधी, स्मृति इराणी, निर्मला सीतारामन यांच्यासह अनेक नेत्यांना टॅग केले होते. आपल्याला कुणी आपल्याला मारून टाकण्याआधी न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी केली होती.

हे पत्र पाठविल्यावर स्वप्ना पाटकर यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढल्या. मंगळवारी बनावट डॉक्टर पदवी प्रकरणात वांद्रे पोलिसांनी त्यांना अटक केली. तपास अधिकारी पोलीस निरिक्षक पद्माकर देवरे यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात डॉ. स्वप्ना पाटकर यांच्याविरोधात जबाब दाखल करून गुन्हा दाखल केला. भादंवि कलम ४१९, ४२०, ४६७, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कानपूर विद्यापीठातून स्वप्ना पाटकर यांनी डॉक्टरेट पदवी मिळविल्याचा दावा तक्रारदार गुरदीप कौर यांनी केला आहे.

कानपूर विद्यापीठातील छत्रपती शाहूजी महाराज विश्व विद्यालय, कानपुर येथून २००९ साली मानसशास्त्र विषयात पीएचडी केल्याचे बनावट प्रमाणपत्र तयार करून घातले आणि ते बनावट असल्याची माहिती असताना देखील २०१६ किंवा यापूर्वी त्या लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे ऑनररी कन्सल्टन्ट म्हणून नियुक्ती मिळवण्यासाठी नमूद बनावट प्रमाणपत्र खरे म्हणून वापरले. स्वत:ला डॉक्टर असल्याचे भासवून सर्वसामान्य जनतेची फसवणूक केल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्या गुरदीप कौर यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात नोंदवली होती.

स्वप्ना पाटकर यांनी शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर ‘बाळकडू’ या मराठी सिनेमाची निर्मिती झाली होती. त्या सिनेमाची निर्मिती डॉ. स्वप्ना पाटकर यांनी केली होती. स्वप्ना या प्रोफेशनली सायकोलॉजिस्ट आहेत. त्यांची द रॉयल मराठी एंटरटेनमेंट नावाची निर्मिती संस्था असून त्याच्या त्या मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. याशिवाय त्यांनी २०१३ मध्ये मराठीत पुस्तकही लिहिले आहे. त्यांची निर्मिती असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित बाळकडू हा मराठी चित्रपट सहा वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्यावेळी त्शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे या चित्रपटाचे सादरकर्ते खासदार संजय राऊत होते.

Swapna Patkar who alleged Sanjay Raut for harrasement arrested on charges of forging doctorate

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती