ममता बॅनर्जींच्या भाच्याला थोबाडीत मारणाऱ्याचा संशयास्पद मृत्यू, व्यासपीठावरच अभिषेक बॅनर्जींना लगावली होती कानशिलात

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे आणि तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव खासदार अभिषेक बॅनर्जी यांना सहा वर्षांपूर्वी थोबाडीत मारणाऱ्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. देबाशीष आचार्य असे या तरुणाचे नाव असून काही अज्ञातांनी त्याला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले होते. देवाशीषने 2020 मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला होता. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्याने भाजपाचा प्रचारही केला होता. Suspicious death of youth who slapped Abhishek Banerji on dice


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे आणि तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिवखासदार अभिषेक बॅनर्जी यांना सहा वर्षांपूर्वी थोबाडीत मारणाºया तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. देबाशीष आचार्य असे या तरुणाचे नाव असून काही अज्ञातांनी त्याला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले होते. देवाशीषने 2020 मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला होता. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्याने भाजपाचा प्रचारही केला होता.



२०१५ मध्ये भर व्यासपीठावर देवाशीष आचार्य याने अभिषेक बॅनर्जी यांना थोबाडीत मारली होती. यानंतर तृणमूल कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना निर्दयी मारहाण केली होती. त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. मात्र, आपण त्याला माफ केले आहे असे अभिषेम बॅनर्जी म्हणाले होते. याच देबाशीषचा आता रहस्यमय मृत्यू झाला आहे. एकाही अज्ञात लोकांनी गंभीर अवस्थेत असलेल्या देवाशीषला रुग्णालयात दाखल केले होते. मात्र त्यानंतर काही वेळात त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी देवाशीषच्या कुटुंबाने त्याची हत्या झाल्याचा आरोप केला आहे.

देवाशीष आचार्यला गंभीर स्थितीत मिदनापुरातील तोमलूक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही अज्ञात लोकांनी त्याला रुग्णालयात आणले होते. त्यानंतर काही वेळेत त्याचा मृत्यू झाला. देवाशीषचे कुटुंब रुग्णालयात पोहचले तेव्हा त्यांना मृत्यूबाबत माहीत झाले. त्यांनी देवाशीषची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. देवाशीषला रुग्णालयात नेमकं कोण घेऊन आलं याचा पोलीस शोध घेत आहेत. घरातील मंडळींनी त्याच्या हत्येचा कट रचला गेल्याचे म्हटले आहे.

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात देवाशीष 16 जूनला दोन मित्रांसोबत मोटर सायकलने बाहेर गेला होता. यावेळी सोनापेट्या टोल प्लाझाजवळ एका चहाच्या दुकानावर ते थांबले. त्यानंतर तो अचानक निघून गेला. भारतीय जनता पक्षाने देबाशीषच्या रहस्यमयी मृत्यूची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशीची मागणी केली आहे.

Suspicious death of youth who slapped Abhishek Banerji on dice

विशेष प्रतिनिधी

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात