नाशिक : अजित पवारांनी शरद पवारांबरोबर फारकत घेऊन शिंदे – फडणवीस सरकार मध्ये तिसऱ्या क्रमांकाचे पद स्वीकारत उपमुख्यमंत्री म्हणून प्रवेश केला. त्याला आता तीन महिने उलटून गेले तरी देखील शरद पवार आपला अजित पवारांना पाठिंबा नाही, असे वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये सांगतात. पण या काका – पुतण्यांच्या राजकीय भांडणात आत्तापर्यंत पवार कुटुंबा मधली जी नावे घेतली गेली नव्हती, ती नावे खासदार सुप्रिया सुळे यांनी इंडिया टुडे कन्क्लेव्हमध्ये दिलेल्या मुलाखतीत घेतली.Supriya sule brought in sharad pawar’s three old brothers in the fight with ajit pawar
मागे हटायचं नाही. आता लढायचं, असं शरद पवारांच्या तिन्ही बंधूंनी शरद पवारांना सांगितल्याचा निर्वाळा सुप्रिया सुळे यांनी दिला. शरद पवारांचे भाऊ 82, 81 आणि 76 वर्षांचे आहेत. ते सगळे शरद पवारांच्या पाठीशी उभे आहेत, असे सुप्रिया सुळे त्या मुलाखतीत म्हणाल्या.
अजितदादांबरोबरच्या संघर्षात सुरुवातीला श्रीनिवास पवारांची एन्ट्री झाली होती. श्रीनिवास पवारांनी सुरुवातीच्या काही दिवसातच यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये जाऊन शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर पत्रकारांसमोर ते आले, पण आपल्याला कोणत्याही राजकीय भाष्य करायचे नाही असे सांगून ते निघून गेले होते.
राखी पौर्णिमेला देखील अजित पवार सुप्रिया सुळे यांच्याकडे गेले नाहीत, तर श्रीनिवास पवार गेले होते आणि त्या दोघांचे फोटो प्रसिद्ध झाले होते. त्यावेळी देखील अजित पवार सुप्रिया सुळेंकडे गेले नसल्याची बातमी ठळक आली. दरम्यानच्या काळात उद्योगपती चोरडियांकडे अजित पवार आणि शरद पवार यांची काही तास भेट झाली. पण त्यानंतर अधिकृतपणे हे दोन्ही नेते एकमेकांना भेटलेले नाहीत.
दरम्यानच्या काळात पवार कुटुंबात आमदार रोहित पवार हे सुप्रिया सुळे यांच्या बाजूने उभे राहिल्याचे दिसले पण पवार कुटुंबीयांपैकी बाकी कोणीही उघडपणे शरद पवार अथवा अजित पवार यांची बाजू घेतलेली दिसलेली नाही.
पण आता मात्र सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांचे तिन्ही वृद्ध बंधू शरद पवारांच्याच पाठीशी असल्याचा निर्वाळा दिला. याचे नेमके रहस्य काय असेल?? राजकीय भांडणात पवार काका – पुतणे उद्या निवडणूक आयोगात लढणारच आहेत, पण कुटुंबाच्या वाटणीतही आता अजित पवार एकाकी पडलेत का?? सुप्रिया सुळे यांचे शरद पवारांच्या बंधू संदर्भात केलेले ते वक्तव्य अजित पवार हे पवार कुटुंबातही एकाकी पडल्याचे निदर्शक आहे का??, असा सवाल तयार झाला आहे.
शरद पवार आणि अजित पवार यांच्यातले राजकीय भांडणाचे मूळ कारण पुतण्या की मुलगी हा पेचच आहे. त्यामुळे आता आपण अजित पवारांशी एकाकीपणे लढू शकत नाही हे लक्षात येताच सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांच्या बाजूला त्यांच्या तीन वृद्ध बंधूंना आणून उभे केले आहे का?? असाही कळीचा सवाल आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लढाईत अजित पवार हे सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी उभे राहिले नाहीत, तर निदान शरद पवारांचे बंधू म्हणजेच आपले सगळे काका आपल्या पाठीशी उभे आहेत हे या वक्तव्यातून सुप्रिया सुळे यांना दाखवून द्यायचे आहे का??, हा देखील महत्त्वाचा सवाल आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App