वृत्तसंस्था
हरिद्वार – कुंभमेळ्यावरून राजकारण सुरू असून देशाच्या धर्म आणि परंपरांची प्रतिमा खराब करण्याचे काम योजनाबध्द पद्धतीने सुरू आहे, असे टीकास्त्र जुन्या आखाड्याचे प्रमुख महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांनी आज सोडले. काँग्रेसचे टूलकिट एक्सपोज झाल्यानंतर विडिओ संदेशातून त्यांनी आपली परखड मते मांडली. Stop politicising Kumbh, traditions being tarnished in ‘well-planned manner’: Juna Akhara’s Swami Avdheshanand
कोरोना वाढता प्रकोप लक्षात घेता कुंभमेळा प्रतिकात्मक ठेवावा आणि कुंभमेळ्यातील शाही स्नानाचा कार्यक्रम स्थगित करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्याला पहिला सकारात्मक प्रतिसाद स्वामी अवधेशानंद गिरी यांनी दिला होता. महाशिवरात्रीचे शाहीस्नान झाल्यानंतर पुढचे कार्यक्रम त्यांनी स्थगित केले होते.
कुंभमेळा कोरोनाचा सुपरस्प्रेडर ठरल्याची टीका काँग्रेसच्या टूलकिटमधून पुढे आल्यावर स्वामी अवधेशानंद यांनी त्यावर परखड मत मांडले. ते म्हणाले, की कुंभमेळ्यावरून राजकारण सुरू आहे, ते ताबडतोब थांबविले पाहिजे. तुम्ही ज्या देशात राहाता, त्याच्या धर्म – परंपरांचा आदर केला पाहिजे. पण सध्या आपल्या धर्म – परंपरांची प्रतिमा खराब करण्याचे काम योजनाबध्द पद्धतीने सुरू आहे. सगळा साधू समाज याचा विरोध करेल. पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर कुंभमेळ्यातील सर्व कार्यक्रम सर्व आखाड्यांनी रद्द केले. अखेरचे शाही स्नान २७ एप्रिल २०२१ ला झाले. त्यानंतर महिनाभर कार्यक्रम होणार होते. पण ते रद्द करण्यात आले याकडे त्यांनी प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App