शेतकरी आंदोलनात फूट, अनेक संघटनांच्या प्रतिनिधींची कृषि मंत्र्यांशी चर्चा


दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत असले तरी अनेक शेतकऱ्यांना हे आंदोलन पसंत नाही. अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची भेट घेऊन कृषी कायद्यात कोणताही बदल करू नये, अशी मागणी केली.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत असले तरी अनेक शेतकऱ्यांना हे आंदोलन पसंत नाही. अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची भेट घेऊन कृषी कायद्यात कोणतेही बदल करू नयेत, अशी मागणी केली. Split in farmers movement, representatives of many organizations discuss with agriculture minister

याबाबत तोमर यांनी सांगितले की, आज अनेक शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आले होते. काही शेतकऱ्यांच्या दबावामुळे सरकार कृषी कायद्यामध्ये बदल करेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा खूप फायदा होणार आहे. त्यामुळे सरकारने या कायद्यांमध्ये कोणताही बदल करू नये, अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी केली.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या काही संघटना नव्या कृषी कायद्याच्या समर्थनार्थ रस्त्यावरही उतरल्या आहेत. नोएडा येथे शेतकऱ्यांनी मंगळवारी कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला होता. या वेळी केंद्राला नव्या कृषी कायद्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली. या शेतकरी संघटना गेल्या आठवड्यापासून कृषी कायद्याच्या समर्थनार्थ गावोगावी जाऊन पंचायत घेत आहेत. यातील बहुतांश शेतकरी हे पश्चिम उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यांतील आहेत.

Split in farmers movement, representatives of many organizations discuss with agriculture minister

आंदोलक शेतकऱ्यांनी कृषी कायद्याचा बारकाईने अभ्यास करावा म्हणजे त्यांना समजेल की हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. हे शेतकरी पंजाब आणि हरियाणाच्या आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेण्यासही निघाले होते. मात्र, पोलीसांनी त्यांना अडविले.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात