
Video Call Blackmailing Cases : आधी फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट, मग ओळख वाढवण्यासाठी चॅटिंग आणि अचानक एक दिवस व्हिडिओ कॉल तोही न्यूड. झालं. सावज जाळ्यात अडकलं की, मग त्याच व्हिडिओची रेकॉर्डिंग दाखवून सुरू होतो ब्लॅकमेलिंगचा खेळ. बदनामीच्या भीतीमुळे पापभीरू माणसं बदमाश सांगतील ती किंमत द्यायला तयार होतात. अशाच प्रकरणांमध्ये कोरोनाच्या काळात मोठी वाढ झाली आहे. या प्रकाराला सेक्सटॉर्शन असंही म्हणतात. असे प्रकार झाल्यास काय करावं, कुठे जावं, कुणाला दाद मागावी, सावज जाळ्यात नेमका अडकतो कसा, याविषयीची माहिती येथे देत आहोत. Social Media Video Call Blackmailing Cases Increased in Corona crisis, Read in details
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आधी फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट, मग ओळख वाढवण्यासाठी चॅटिंग आणि अचानक एक दिवस व्हिडिओ कॉल तोही न्यूड. झालं. सावज जाळ्यात अडकलं की, मग त्याच व्हिडिओची रेकॉर्डिंग दाखवून सुरू होतो ब्लॅकमेलिंगचा खेळ. बदनामीच्या भीतीमुळे पापभीरू माणसं बदमाश सांगतील ती किंमत द्यायला तयार होतात. अशाच प्रकरणांमध्ये कोरोनाच्या काळात मोठी वाढ झाली आहे. या प्रकाराला सेक्सटॉर्शन असंही म्हणतात. असे प्रकार झाल्यास काय करावं, कुठे जावं, कुणाला दाद मागावी, सावज जाळ्यात नेमका अडकतो कसा, याविषयीची माहिती येथे देत आहोत.
सॉफ्टवेअर अभियंत्याची आत्महत्या
बंगळुरूतील सॉफ्टवेअर अभियंता अविनाश बीएसला सोशल मीडियावर कॉल येतो. या कॉलवर एक महिला नग्न होऊन बोलत आहे. काही दिवसानंतर त्याला पैशांची मागणी करण्यास सुरुवात होते. पैसे न दिल्यास बदनामी करण्याची धमकी दिली जाते. यामुळे त्रस्त होऊन अविनाशने यावर्षी 23 मार्च रोजी आत्महत्या केली.
यूपीत राजकारण्यालाही अडकवले जाळ्यात
उत्तर प्रदेशमधील रामपूरमधील एका भाजप नेत्याला 22 एप्रिल रोजी असाच अश्लील कॉल आला. त्यानंतर त्याच्याकडे पैशांची मागणी करण्यास सुरवात झाली. पैसे न दिल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी होती. त्यांनी 24 मे रोजी पोलिसांत तक्रार करण्याचे धाडस केले, यामुळे संपूर्ण प्रकरण चव्हाट्यावर आला.
वर उल्लेखलेल्या दोन्ही घटनांमध्ये एक साम्य आहे. सोशल मीडियावर अश्लील कॉल करून एखाद्या व्यक्तीचे व्हिडिओ आक्षेपार्ह स्थितीत बनवले जातात आणि त्यानंतर ब्लॅकमेल करून पैसे उकळले जातात. पोलीस या प्रकारच्या सायबर गुन्ह्यास सेक्सटॉर्शन असे नाव देतात. सेक्स्टॉर्शन म्हणजे लैंगिक संबंधासह व्हिडिओद्वारे किंवा चॅटद्वारे पैसे उकळणे.
यापूर्वीही अशी काही प्रकरणे समोर येत असत, परंतु लॉकडाऊन दरम्यान अशा घटनांमध्ये खूप वेगाने वाढ झाली आहे. पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की अशा गुन्ह्यांच्या आकडेवारीचे अद्याप पूर्ण विश्लेषण झाले नाही, परंतु असे म्हटले जाऊ शकते की सामान्य दिवसांच्या तुलनेत सेक्सटॉर्शनच्या घटनांमध्ये पाच पट म्हणजेच 500 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सेक्सटॉर्शन म्हणजे काय?
एखाद्याला केवळ अश्लील व्हिडिओ कॉल करून ब्लॅकमेल करणे कसे सुरू होऊ शकते? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पोलिस अधिकारी याबाबत सांगतात की, एखाद्या व्यक्तीशी सोशल मीडियावर जवळीक वाढवली जाते. यानंतर त्याला व्हिडिओ कॉलवर येण्यास उद्युक्त केले जाते. रेकॉर्ड केलेला अश्लील व्हिडिओ अशा प्रकारे प्ले केला जातो जेव्हा जेव्हा एखादा माणूस व्हिडिओ कॉलवर दिसतो तेव्हा लाइव्ह वाटेल. पॉर्न व्हिडिओ चालू असताना कॉलवर उघड झालेल्या व्यक्तीला कपडे उतरवण्यास सांगितले जाते आणि नंतर त्याचा / तिचा स्क्रीन रेकॉर्ड केला जातो. नंतर तोच रेकॉर्ड स्क्रीन त्या व्यक्तीकडे पाठवला जाते आणि ब्लॅकमेलिंगची साखळी सुरू होते.
सेक्सटॉर्शन पीडिताची आपबीती
सेक्सटॉर्शन पीडित यूपीच्या एका नेत्याने याबबात सविस्तर माहिती दिली आहे. माझ्या फेसबुक प्रोफाइलमध्ये एक महिला जोडली गेली होती. तिने माझी ओळख एका मुलीशी करून दिली. तिने माझ्याशी मेसेंजरवर एक-दोन दिवस अशा प्रकारे चॅट केली की मी व्हिडीओ कॉलवर येण्याचे मान्य केले. एके दिवशी रात्री अकराच्या सुमारास त्या मुलीने नग्न व्हिडिओ कॉल केला. तिने माझा व्हिडिओ रेकॉर्ड केला. मग दोन दिवसांनी तिने पैशांची मागणी सुरू केली. आधी तिने वीस हजार रुपये मागितले. मला वाटले की, फकत वीस हजार दिले तर ब्याद निघून जाईल. पण पुन्हा मी विचार केला की एकदा पैसे दिल्यावर ते पुढे त्यांना ब्लॅकमेल करत राहतील. म्हणून जेव्हा पुढचा कॉल आला, तेव्हा मी पोलिसांना कळविले. पोलिसांना कळविल्यानंतरही ब्लॅकमेलर्सनी पैसे मागणे थांबवले नाही. मला दिल्ली पोलिस गुन्हे शाखेतील बनावट अधिकारी बनून फोन करण्यात आला. धमकावण्यात आले. यानंतरही, ब्लॅकमेलर्सनी सांगितले की त्यांचा व्हिडिओ यूट्यूबवर टाकण्यात आला आहे. मला सांगण्यात आले होते की, तुम्हाला व्हिडिओ हटवायचा असेल तर यूट्यूब कस्टमर केअरकडे जा. त्यांना एक नंबरही देण्यात आला होता. कॉल केल्यावर सांगण्यात आले की, तुम्हाला व्हिडिओ हटवायचा असेल तर यूट्यूबला प्रोसेसिंग फी भरावी लागेल.
बदनामीच्या भीतीमुळे 90% लोक समोर येत नाहीत
यूपीतील नेत्याच्या प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी म्हणाले की, जेव्हा आम्ही गुन्हेगारांना पकडले तेव्हा आम्हाला अशा अनेक लोकांची माहिती मिळाली ज्यांनी गुन्हेगारांना पैसे दिले होते. जर त्यांना पकडले गेले नसते तर या लोकांनी त्यांना ब्लॅकमेल करणे सुरूच ठेवले असते. भाजप नेत्याने पोलिसांना वेळेवर माहिती दिली, अशा परिस्थितीत आरोपींचे कॉल ट्रेस करून अटक करण्यात आली होती, परंतु अशा 90% घटनांमध्ये पीडित व्यक्ती पोलिसांकडे येतच नाहीत.
लॉकडाऊनमध्ये सेक्सटॉर्शनमध्ये वाढ
लॉकडाऊनदरम्यान अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे का? या प्रश्नावर उत्तर प्रदेश पोलीस मुख्यालयात तैनात एसपी सायबर क्राइम त्रिवेणी सिंह म्हणतात, ‘लॉकडाऊनमध्ये नक्कीच प्रकरणे वाढली आहेत. किती वाढ झाली आहे, त्याचे विश्लेषण अद्याप झाले नाही. परंतु हे समजून घ्या की, सायबर गुन्हे शाखेची सर्व संसाधने सध्या अशा गुन्ह्यांच्या तपासणीत गुंतलेली आहेत.
पोलिसांच्या मते, ब्लॅकमेल करणाऱ्या टोळ्या या भरतपूर आणि मेवात भागात सक्रिय आहेत. यूपी पोलिसांच्या सायबर शाखेचा एक अधिकारी म्हणतो, ‘हा व्यवसाय कुटीर उद्योगाप्रमाणे चालवला जात आहे. हजारो युवक याच्याशी निगडित आहेत. टोळी तरुणांना गुन्हे करण्याचे प्रशिक्षणही देत आहे. त्यापैकी बहुतेक लोक खेड्यातून काम करणारे कमी शिक्षित लोक आहेत.
सेक्सटॉर्शनमध्ये अडकल्यास काय कराल?
तुम्हालाही जर असे कॉल आले तर सर्वात आधी त्या लिंक किंवा फोन क्रमांकांची नोंद करून ठेवा, ज्यावरून कॉल आला आहे. यामुळे पोलिसांना ब्लॅकमेलर्सपर्यंत पोहोचायला मदत होईल.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे तातडीने स्थानिक सायबर सेल किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार द्या. अशा प्रकरणात तक्रारदाराची ओळख काटेकोरपणे गोपनीय ठेवली जाते. ब्लॅकमेलर्स नंबर बदलून कॉल करतात, पोलिसांना या सर्वाबद्दल संपूर्ण माहिती देतात. पोलीस अनेकदा तक्रार करणाऱ्याला प्रश्न विचारतात, ते त्यांचे कामच आहे. परंतु अशा प्रश्नांमुळे घाबरून जाऊ नका. पोलिसांना सहकार्य करत सुरुवातीपासूनची सर्व माहिती सांगा. आपली तक्रार नोंदवण्याचा आग्रह धरा. अशा प्रकरणांमध्ये आयटी कायदा, फसवणूक (कलम 420) आणि आयपीसीच्या काही इतर कलमांतर्गत गुन्हा नोंदविला जातो. पोलिसांकडून एफआयआरची प्रत घ्या. पोलिसांच्या कारवाईत चालढकलपणा आढळल्यास तत्काळ वकिलाची मदत घ्या.
Social Media Video Call Blackmailing Cases Increased in Corona crisis, Read in details
महत्त्वाच्या बातम्या
- आम आदमी पार्टीचा पंजाबचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार शीख समुदायातून असेल; अरविंद केजरीवालांची घोषणा
- नवी मुंबई विमानतळ नामकरणाच्या वादात राज ठाकरे उतरले; नाव छत्रपती शिवाजी महाराजांचेच असावे, म्हणाले…!!
- ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, मंत्री विजय वडेट्टीवारांचा इशारा
- उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यक्रमातील गर्दी, राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांना अटक
- काँग्रेस – राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडायला फुल्ल परवानगी, पण शिवसेनेला हात लावायचा नाही हे ठरलेलं – हसन मुश्रीफ