लाल दिव्याच्या गाड्या नाहीत की सुरक्षेचा बडेजाव, सर्वसामान्यांप्रमाणे बसून स्मृति इराणीआणि मुख्तार अब्बास नक्वी यांनी घेतला वडापावचा स्वाद

विशेष प्रतिनिधी

मुंबई: दोन केंद्रीय मंत्री आलेले; पण लाल दिव्यांच्या गाड्या नाहीत की सुरक्षेचा बडेजाव नाही. अगदी सर्वसामान्यांप्रमाणे हॉटेलमध्ये येऊन महिला व बालविकास मंत्री स्मृति इराणी आणि केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आपल्या मुंबई भेटीत माटुंगा येथील एका भोजनालयात मसाला डोसा आणि वडापाववर यथेच्छ ताव मारला. Smriti Irani and Mukhtar Abbas Naqvi tested Vadapav while sitting as usual.

भोजनालयाच्या कर्मचाऱ्याने सांगितले की, आमच्या भोजनालयात केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास आणि स्मृती इराणी आल्या. सर्वसामान्य नागरिकाप्रमाणेच ते भोजनालयात बसून खात होते. आपल्या बाजूला बसून दोन केंद्रीय मंत्री आवडत्या पदार्थांवर ताव मारत असल्याचे पाहून भोजनालयात आलेल्या सर्वसामान्य लोकांना आश्चयार्चा धक्काच बसला. येथे त्यांना कोणत्याही प्रकारची व्हीआयपी ट्रिटमेंट मिळालेली नाही.



पोषण जागरुकता अभियान या कार्यक्रमासाठी नक्वी आणि इराणी मुंबईत आले आहेत. केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय आणि महिला व बालविकास मंत्रालयाच्या संयुक्त सहभागातून हे अभियान सुरू करण्यात आले आहे.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी धारावीत असलेल्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना केंद्राला भेट दिली. तेथे त्यांनी लाभार्थ्यांशी चर्चा केली, तसेच त्यांच्या घरी देखील भेट दिली.

इराणी यांनी आयसीडीएस येथे डिजिटल गुड्डी गुड्डा बोर्डचे उद्घाटन देखील केले. बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाअंतर्गत जन्मदराची माहिती अद्ययावत करणे, देखरेख करणे आणि ती माहिती दाखवण्यासाठी या बोर्डचा वापर होतो. बोर्डावर अभियानाबाबतची माहिती आणि शैक्षणिक साहित्याबाबत माहितीही दिली जाते. याचा उपयोग अभियानाचा प्रचार करणे आणि उपयुक्त माहिती देत राहणे यासाठी देखील बोर्डाचा वापर केला जातो, अशी माहिती अभियात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिली.

Smriti Irani and Mukhtar Abbas Naqvi tested Vadapav while sitting as usual.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात