सिंगापूरमध्ये लसीकरणानंतरही संसर्ग पसरला, ब्रिटनमध्ये नागरिकांना तिसरा बुस्टर डोस देणार


विशेष प्रतिनिधी

सिंगापूर – येथे चोवीस तासात ८३७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हा आकडा एका वर्षातील सर्वाधिक आहे. त्यामुळे कोरोनाचा पुन्हा फैलाव होत असल्याचे चित्र आहे. Singapore, Briton struggling to deal with corona

सिंगापूरमध्ये ८० टक्के लसीकरण झालेले असताना कोरोना संसर्ग पसरत आहे. काल देशातील ८०९ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यापैकी ७५ जण गंभीर आजारी असून त्यांना ऑक्सिजन द्यावे लागत आहे. गेल्या २८ दिवसात चौघांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजनची गरज भासणाऱ्या रुग्णांची संख्या दोन दिवसांत दुप्पट झाली आहे. त्यामुळे संसर्गाची तीव्रता पाहता देश लॉकडाउनुमक्त करण्याचा निर्णय सध्या लांबणीवर टाकला आहे.दरम्यान ब्रिटनमध्ये हिवाळ्यात कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी विंटर प्लॅन जारी केला आहे. नाइट क्लब, म्युझिक वेन्यू, बिझनेस कॉन्फरन्स, स्टेडीयम आदी ठिकाणी व्हॅक्सिन पासपोर्ट लागू केला आहे. केवळ लसीकरण झालेल्या नागरिकांनाच कार्यक्रमाच्या ठिकाणी सोडले जाणार आहे. तसेच मास्कचे बंधन घातले आहे. पुढील आठवड्यात ५० पेक्षा अधिक वयोगटातील लोकांसाठी बूस्टर डोस दिला जाणार आहे. ब्रिटनमध्ये अजूनही दररोज ३० हजारापेक्षा अधिक रूग्ण आढळून येत आहेत. आतापर्यंत ७२.८ लाख जणांना बाधा झाली आहे.

Singapore, Briton struggling to deal with corona

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण