शिवसेनेचे 15 – 21 नव्हे तर तब्बल 40 आमदार घेऊन एकनाथ शिंदे हे गुजरात मधल्या सुरत मधून थेट आसाममधल्या गुवाहाटीत दाखल झाले आहेत. शिवसेनेतल्या आतापर्यंतची ही सर्वात मोठी बंडखोरी असून एकनाथ शिंदे छगन भुजबळ किंवा नारायण राणे यांचे वारसदार ठरले नसून ते थेट गुजरातचे माजी मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांचे वारसदार ठरले आहेत!!Shivsena splits : eknath shinde, political heir of not only of balasaheb Thackeray but also of chimanbhai patel
भले एकनाथ शिंदे हे 40 आमदारांसह बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा वारसा चालवणार असतील पण त्यांच्या राजकीय कौशल्यातून त्यांनी आपण चिमणभाई पटेल यांचे खरे राजकीय वारसदार असल्याचे सिद्ध केले आहे!!
कोण होते चिमणभाई पटेल??
गुजरातचे माजी मुख्यमंत्री कै. चिमणभाई पटेल हे असे व्यक्तिमत्त्व होते, जे स्वतःच्या राजकीय कौशल्याच्या बळावर अख्खा पक्षच म्हणजे पक्षाचे सगळे आमदार एका पक्षातून दुसऱ्या पक्षात घेऊन जात असत.
Maharashtra political crisis: Eknath Shinde claims 40 Shiv Sena MLAs reached Assam, says will carry Balasaheb Thackeray's Hindutva Read @ANI Story | https://t.co/G8RXiKqxPG#MaharashtraPoliticalCrisis #EknathShinde #ShivsenaMLA pic.twitter.com/IiUy3r7jh0 — ANI Digital (@ani_digital) June 22, 2022
Maharashtra political crisis: Eknath Shinde claims 40 Shiv Sena MLAs reached Assam, says will carry Balasaheb Thackeray's Hindutva
Read @ANI Story | https://t.co/G8RXiKqxPG#MaharashtraPoliticalCrisis #EknathShinde #ShivsenaMLA pic.twitter.com/IiUy3r7jh0
— ANI Digital (@ani_digital) June 22, 2022
अख्ख्या पक्षाचे पक्षांतर करण्याचे कौशल्य
पहिल्यांदा ते काँग्रेसचे मुख्यमंत्री झाले. कारण ते इंदिरा निष्ठा काँग्रेसचे नेते होते. 1977 मध्ये मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्ष सत्तेवर आला. त्यावेळी चिमणभाई पटेल यांनी गुजरातमध्ये संपूर्ण काँग्रेस पक्ष आपल्या सकट जनता पक्षात विलीन केला आणि ते गुजरातचे जनता पक्षाचे मुख्यमंत्री बनले. जनता पक्षाची राजवट संपुष्टात आल्यानंतर त्यानंतर त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हा देखील संपूर्ण पक्ष म्हणजे सगळे आमदार त्यांनी काँग्रेसमध्ये आणून दाखवले आणि ते पुन्हा मुख्यमंत्री बनले. चिमणभाई पटेल यांच्यावरची निष्ठा आमदारांनी कधी कमी केली नाही. त्यांच्यावर विश्वास ठेवून आमदार एका पक्षातून दुसऱ्या पक्षात बिनधास्त दाखल होत असत त्याची राजकीय किंमत त्यांना चोख मिळत असे.
शिंदें बरोबर 40 आमदार
एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडली तेव्हा केवळ 15 – 20 आमदार नव्हे, तर 2/3 शिवसेना फोडून म्हणजे तब्बल 40 आमदार फोडून आपलाच गट हा मूळ शिवसेना असल्याचा दावा केला आहे. याचाच अर्थ ते चिमणभाई पटेल यांचे खरे राजकीय वारसदार ठरले आहेत.
आज दुपारी राज्यपालांना भेटणार
आज दुपारी ते गुवाहाटीतून थेट मुंबईत येऊन राज्यपालांना भेटणार आहेत. त्यांच्याकडे आपल्या गटाच्या मूळ शिवसेना असलेल्या दाव्याला अधिमान्यता मागणार आहेत.
बाळासाहेबांची पुन्हा घोषणा
त्याच वेळी एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांची गर्व से कहो हम हिंदू है ही घोषणा परत देऊन आपण कोणत्याही स्थितीत हिंदुत्व सोडणार नसल्याची ग्वाही दिली आहे. शिंदे वगळता बाकी कोणताही आमदार मीडियाशी बोललेला नाही. यामध्ये अब्दुल सत्तार आणि बच्चू कडू या मंत्र्यांचा समावेश आहे. परंतु, कोणीही कॅमेरासमोर उघडपणे आलेले नाही. शिवसेनेच्या आमदारांना धाकदपटशा दाखवला आहे मारहाण केली आहे अशा स्वरूपाचे आरोप संजय राऊत यांनी केले होते परंतु हे सर्व आमदार ग्रुप फोटोमध्ये आले ते बस मधून जाताना कॅमेरात टिपले गेले. गुवाहाटी विमानतळावर कॅमेरात एकत्र टिपले गेले. तेव्हा धाकदपटशा अथवा मारहाणीचे तसे कोणतेही चिन्ह दिसले नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App