शिवसेनेच्या इतिहासाच्या विपरीत : सुरतमध्ये नार्वेकर शिष्टाई; पण एकनाथ शिंदें थेट भिडले!! उद्धव साहेबांना अटी शर्ती!!


नाशिक : बंड करणारा कितीही मोठा नेता असो त्याच्याशी चर्चा वाटाघाटी, शिष्टाई वगैरे काही नाही हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा खाक्या होता. गद्दारांच्या घरी हल्ले, राडे ही शिवसेनेची स्टाईल होती. या शिवसेना स्टाईलचे फटके खुर्द छगन भुजबळ यांनी खाल्ले होते. नारायण राणे यांना देखील याची झळ पोहोचली होती. पण सध्या शिवसेना या अर्थाने बाळासाहेबांची उरली नसल्याची वस्तुस्थिती आहे!! Shivsena splits : eknath shinde directly questions and asks Uddhav Thackeray to shun NCP and Congress Alliance

कारण शिवसेनेच्या इतिहासाच्या विपरीत वाटाघाटी, शिष्टाई असा अनुभव आज एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या बाबतीत आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले दूत मिलिंद नार्वेकर आणि फाटक यांना एकनाथ शिंदे यांच्याकडे शिष्टाईसाठी पाठवले होते. या दोघांनी उद्धव ठाकरे यांच्या वतीने शिष्टाई केली. पण एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरे यांनाच प्रतिसवाल करून 2 तास झालेली चर्चा एक प्रकारे निष्फळ ठरवली.

मी स्वतंत्र पक्ष काढला नसताना मला गटनेता पदावरून का काढले?? संजय राऊत माझ्याशी एक बोलतात आणि मिडिया दुसरे बोलतात!! आमदारांच्या अपहरणाचा आरोप माझ्यावर का लावला??, असे रोकडे आणि परखड सवाल एकनाथ शिंदे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन वरून केल्याच्या बातम्या आहेत.



सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या या बातम्या जर खरे असतील तर पठ्ठा भिडला असेच म्हणावे लागेल. कारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत या पद्धतीची पक्षप्रमुखांना उलटे प्रश्न विचारायची कोणत्या शिवसैनिकांनी हिंमत दाखवलेली नाही. ती हिंमत आज एकनाथ शिंदे यांनी अटी शर्ती घालून दाखवली आहे. हे एकनाथ शिंदे यांचे बंड आणि बाकीच्यांचे बंड यातला फरक आहे!!

शिवसेना एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह सध्या सूरतमध्ये आहेत. एकनाथ शिंदे यांचा मुक्कात सूरतमधल्या मेरिडेयन हॉटेलमध्ये असून त्यांच्यासोबत त्यांचे समर्थक आमदार उपस्थित आहेत. एकनाथ शिंदे यांचे बंड शमवण्यासाठी शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत.

शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक यांनी मुख्यमंत्र्याचा निरोप घेऊन सूरतमध्ये एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांच्यादरम्याची बैठक संपलीय. तब्बल तासभर ही बैठक चालली. या बैठकीत नार्वेकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या प्रस्तावावर शिंदेंशी चर्चा केली.

एकनाथ शिंदे यांनी नार्वेकर यांच्यासमोर अटी ठेवल्याची बातमी आहे.

एकनाथ शिंदे यांच्या चार अटी

  • – भाजपसोबत गेल्यास शिवसेनेतच राहणार
  • – काँग्रेस, राष्ट्रवादीशी आघाडी तोडण्याची अट
  • – काँग्रेस, राष्ट्रवादीवर आमदारांची नाराजी
  • – भाजपसोबत शिवसेनेने सरकार स्थापन करण्याची मागणी

आता या भेटीनंतर काय होणार? एकनाथ शिंदे यांचे बंड थंड होणार की महाविकास आघाडी सरकारला पायउतार व्हावे लागणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Shivsena splits : eknath shinde directly questions and asks Uddhav Thackeray to shun NCP and Congress Alliance

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात