विधान परिषद निवडणूक : इंदिराजी – राजीवजींच्या काळातले “द्रष्टेपण” 2022 मध्ये सिद्ध!!


महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 20 जून 2022 संदर्भात विश्लेषण करताना, “इंदिराजी राजीवजी यांच्या काळातल्या द्रष्टेपण 2022 मध्ये सिद्ध झाले”, हे शीर्षक जरा विचित्र वाटेल… पण हे खरेच घडले आहे!!Maharashtra state council Elections : Congressmen proved that only Congress can defeat Congress and not other parties can do it!!

काँग्रेसच काँग्रेसचा पराभव करते

इंदिराजी आणि राजीव गांधी यांच्या काळात काँग्रेसजन आत्मविश्वासाने निवडणुकीचे भाकीत करायचे, तोच आत्मविश्वास 2022 मध्ये खरा ठरला आहे… तो म्हणजे काँग्रेसचा पराभव इतर कोणतेही पक्ष करू शकत नाहीत… तर काँग्रेसचा पराभव फक्त काँग्रेसच करू शकते हा तो “आत्मविश्वास” आहे!!चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव

विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसचे दलित उमेदवार चंद्रकांत हांडोरे यांचा झालेला पराभव हा इंदिराजी आणि राजीवजी यांच्या काळातल्या काँग्रेसजनांच्या या आत्मविश्वासाचा परिपाक आहे!! कारण चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप या विधान परिषदेच्या दोन्ही उमेदवारांना काँग्रेसकडे मतांचा पुरेसा कोटा असून देखील पहिल्या पसंतीची मते मिळू शकलेली नाहीत. याचा अर्थ काँग्रेसची मते फुटली आणि याचाच अर्थ काँग्रेसच काँग्रेसचा पराभव करू शकते हा देखील होतो आहे!!

 परंपरेचे पाईक – लाथाळ्यांचे राजकारण

इंदिराजी आणि राजीव यांच्या काळात बलाढ्य असलेल्या काँग्रेसमध्ये काँग्रेसजन इंदिराजींना आणि राजीवजींना दबून असायचे. पण खाली गटातटांचे राजकारण करून आपापसात बिनधास्त लाथाळ्या करायचे. तेच चित्र विधान परिषदेच्या निवडणुकीत स्पष्ट दिसले आहे. आज इंदिराजी नाहीत. राजीवजी नाहीत. काँग्रेस देखील तेवढी बलाढ्य उरलेली नाही. पण काँग्रेसमध्ये गटातटाचे राजकारण आणि बिनधास्त लाथाळ्या करणाऱ्या काँग्रेसजनांच्या
त्या परंपरेचे पाईक मात्र निश्चित पुढे आले आहेत. महाराष्ट्र विधानसभेत परिषदेच्या निवडणुकीत याच परंपरेच्या पाईकांनी आपल्याच पक्षाच्या दलित उमेदवाराचा पराभव करण्याचा “पराक्रम” करून दाखवला आहे!! या पराक्रमाला काँग्रेसच्या इतिहासात तोड नाही!!

 हंडोरेंना मतांचा कोटा पहिला, प्रत्यक्ष मते शेवटची

विधान परिषद निवडणुकीत ज्याला मतांच्या पहिल्या पसंतीचा कोटा दिला तो उमेदवार शेवटच्या क्रमांकावर नेऊन ठेवण्याची “किमया” खरंच बाकी कोणताही पक्ष करू शकत नाही, ती “किमया” फक्त कॉंग्रेसच करू शकते!! ही वस्तुस्थिती या निवडणुकीच्या निमित्ताने दिसून आली आहे!! चंद्रकांत हांडोरे यांच्यासाठी राखून ठरवलेली पहिल्या पसंतीची 4 मते भाई जगताप यांना मिळाली आहेत. त्यामुळे हंडोरे शेवटच्या क्रमांकावर घसरले आहेत.

काँग्रेसजनांची “किमया”

भले राजकीय विश्लेषक देवेंद्र फडणवीसांचा चाणक्यगिरीची आरती ओवाळत असोत किंवा अजित पवारांची चाणक्यगिरी फक्त राष्ट्रवादीसाठी उपयोगी पडली असे म्हणत असोत त्यांचे विश्लेषण त्यांना लखलाभ असो!! पण काँग्रेसचा काँग्रेसचा पराभव करू शकते ही “किमया” ना देवेंद्र फडणवीस यांना साधता आली, ना अजित पवारांना!! ही “किमया” फक्त इंदिराजी आणि राजीवजींच्या काळातल्या काँग्रेसजनांचे परंपरेचे पाईक वारसदारच करू शकतात हे महाराष्ट्रातल्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सिद्ध झाले आहे!!

Maharashtra state council Elections : Congressmen proved that only Congress can defeat Congress and not other parties can do it!!

महत्वाच्या बातम्या 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात