विशेष प्रतिनिधी
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या खासदार किरण खेर यांना ब्लड कॅन्सर झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.She is a fighter …! Anupam Kher; BJP MP Kiran Kher gets blood cancer; Treatment started in Mumbai !
बुधवारी चंदीगढ भाजप प्रदेशाध्यक्ष अरुण सूद यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेला किरण अनुपस्थित होत्या. किरण खेर या चंदीगढ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत.
अनुपम खेर यांनी पत्नी किरण खेर यांच्या तब्येतीची माहिती देताना ट्विटरवर सांगितले की, ‘किरण खेरला रक्ताचा कर्करोग झाला आहे.’
‘ही अफवा नाही, म्हणून मला आणि सिकंदरला हे सांगायचे आहे की किरण मल्टिपल मायलोमा या एक प्रकारच्या रक्ताच्या कर्करोगाने ग्रस्त आहे. तिच्यावर आत्ताच उपचार सुरू झाले आहेत आणि आम्हाला खात्री आहे की, ती यापेक्षा पूर्वीपेक्षा अधिक सामर्थ्यवान होईल.
किरणच्या उपचारांसाठी डॉक्टरांची एक चांगली टीम आम्हाला मिळाली हे आमचे भाग्य आहे, ती नेहमी लढवय्यी होती आणि नेहमी लढत राहील.’
‘किरणच्या हृदयात नेहमीच प्रेम असते आणि म्हणूनच लोक तिच्यावर खूप प्रेम करतात. तुम्ही तुमच्या प्रार्थना आणि किरणबद्दलचं प्रेम व्यक्त करत आहात. ती आता ठीक आहे आणि रिकव्हर होत आहे, आम्ही आपल्या प्रेम आणि समर्थनाबद्दल कृतज्ञ आहोत.’ अशी पोस्ट अनुपम खेर यांनी लिहिली आहे.
🙏 pic.twitter.com/3C0dcWwch4 — Anupam Kher (@AnupamPKher) April 1, 2021
🙏 pic.twitter.com/3C0dcWwch4
— Anupam Kher (@AnupamPKher) April 1, 2021
गेल्यावर्षी किरण खेर यांना या आजाराचं निदान झालं होतं. उपचारानंतर किरण खेर यांची तब्येत ठिक असून त्या मुंबईमध्ये आहेत अशी माहितीही अरुण सूद यांनी दिली.
गेल्या वर्षी नोव्हेंबर माहिन्यात किरण खेर चंदीगढमध्ये असताना त्यांना या आजाराबाबत कळालं. त्यानंतर त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूच ऑफ मेडिकल अॅन्ड एज्युकेशन अँड रिसर्चमध्ये (PGIMER) मेडिकल टेस्ट केल्यानंतर त्यांना मल्टीपल मायलोमा याचे निदान झाले. त्यानंतर त्यांना 4 डिसेंबर रोजी उपचारासाठी मुंबईला आणण्यात आलं.
सूद म्हणाले, चार महिने उपचार घेतल्यानंतर आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सध्या त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं नाही पण त्यांना उपचारासाठी नियमितपणे रुग्णालयात जावं लागत आहे.
किरण खेर या 2014 साली पहिल्यांदा भाजपच्या तिकिटावर लोकसभेवर निवडून आल्या होत्या. 2019 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा निवडणूक जिंकत खासदारकी मिळवली.
अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये नावारूपास आलेल्या किरण यांनी 1990 साली सरदारी बेगम या श्याम बेनेगल यांच्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
या सिनेमासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. बैरीवाली या बंगाली चित्रपटासाठीत्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App