नंदीग्राममधील मतदानाच्या ऐन मध्यावर मोदींनी ममतांना डिवचले; दीदी, तुम्ही दुसऱ्याही मतदारसंघातून फॉर्म भरताय असे ऐकलेय, खरंय काय ते…??


वृत्तसंस्था

उलूबेरिया – पश्चिम बंगालच्या हाय व्होल्टेज नंदीग्राम मतदारसंघात मतदानाच्या ऐन मध्यावर राजकीय ममतादीदींचा राजकीय ड्रामा चालू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना उलूबेरियाच्या सभेतून डिवचले आहे… मतदान अद्याप पूर्ण व्हायचे आहे, त्याच्या आतच ममतांचा नंदीग्राममधला पराभव गृहीत धरून मोदींनी दीदींना सवाल केलाय, तुम्ही आता दुसऱ्या मतदारसंघातून देखील फॉर्म भरणार आहात, असे बंगालमध्ये आता ऐकायला मिळते आहे… हे खरे आहे का दीदी… Didi is there any truth in the rumour that you are going to file nomination from another constituency?

तिकडे मतदान चालू असतानाच नंदीग्राममध्ये ममतादीदी आंदोलन करताहेत. गृहमंत्री अमित शहा, निवडणूक आयोग आणि केंद्रीय दलांच्या नावाने खडे फोडताना दिसत आहेत. नेमका तोच धागा पकडून पंतप्रधान मोदींनी ममतांना डिवचले आहे.मोदी म्हणाले, की दीदी बहुतेक नंदीग्रामच्या मतदारांनी तुम्हाला परखड उत्तर दिलेले दिसतेय आणि म्हणून तुम्ही दुसरीकडे जाण्याच्या बेतात दिसत आहात. पण दीदी तुम्ही कुठेही जा. बंगालच्या जनतेने आता ठरवलेच आहे, तिथे लोक तुम्हाला परखड उत्तर द्यायला टपलेलेच आहेत. बंगालच्या जनतेने या वेळी ठामपणे ठरविले आहे, दीदींना घालवा, भाजपला आणा…!!, असा टोला मोदींनी हाणला.

तत्पूर्वी, ममता बॅनर्जींनी नंदीग्राममध्ये मतदान केंद्राबाहेर आंदोलन करताना तेथूनच राज्यपाल जगदीप धनकर यांना फोन लावला. पत्रकारांशी बोलताना व्ही फॉर व्हिक्टरीची खूण केली. तुमच्या गुंड आणि अधिकाऱ्यांना वेळीच आवरा. ते माझ्या रॅलीत महिला पत्रकारांशी गैरवर्तन करताहेत, असे त्यांनी अमित शहा आणि निवडणूक आयोगाला सुनावले.

मी निवडणूक आयोगाच्या निरीक्षकांना सगळे सांगितले आहे. ते गुप्त आहे. ते मी जाहीरपणे सांगू शकत नाही. पण मी एक सांगू शकते, एवढी वाईट निवडणूक मी कधी पाहिली नव्हती, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

Didi is there any truth in the rumour that you are going to file nomination from another constituency?

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात