ओमिक्रॉनच्या भीतीने शेअर बाजार आपटला, सेन्सेक्समध्ये 764 अंकांनी घसरण, निफ्टी पुन्हा 17200 च्या खाली

Share Market Crashed Amid Fear Of Omicron, Sensex Fall by 764 Points Nifty Below 17200

Share Market Crashed : गुरुवारी भारतातील दोन जणांमध्ये कोविड-19 च्या नवीन ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळल्याचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून आला आहे. शुक्रवारी बाजारात मोठी घसरण झाली. आज आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 764.83 अंकांनी घसरला. तो 1.31 टक्क्यांनी घसरून 58 हजारांच्या खाली पोहोचला आणि 57,696.46 वर बंद झाला. Share Market Crashed Amid Fear Of Omicron, Sensex Fall by 764 Points Nifty Below 17200


वृत्तसंस्था

मुंबई : गुरुवारी भारतातील दोन जणांमध्ये कोविड-19 च्या नवीन ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळल्याचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून आला आहे. शुक्रवारी बाजारात मोठी घसरण झाली. आज आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 764.83 अंकांनी घसरला. तो 1.31 टक्क्यांनी घसरून 58 हजारांच्या खाली पोहोचला आणि 57,696.46 वर बंद झाला.

एनएसईच्या निफ्टीचीही वाईट स्थिती होती आणि तो पुन्हा एकदा 204.95 अंकांनी म्हणजेच 1.18 टक्क्यांनी घसरून 17,200 च्या खाली गेला. व्यवहाराच्या शेवटी निफ्टी 17,196.70 च्या पातळीवर बंद झाला.

BSE चा 30 शेअर्सचा सेन्सेक्स आज 215.12 अंकांच्या किंवा 0.37 टक्क्यांच्या वाढीसह 58,676.41 वर उघडला, तर NSE चा निफ्टी 68 अंकांच्या किंवा 0.39 टक्क्यांच्या वाढीसह 17,469.65 वर उघडला. लार्सन आणि ट्रुबोच्या समभागांना सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये चांगला फायदा झाला.

गुरुवारी बाजार चांगलाच बहरला होता आणि सेन्सेक्स-निफ्टी दोन्ही जोरदार वाढीसह बंद झाले. 776.50 अंक किंवा 1.35 टक्क्यांच्या वाढीसह बीएसई सेन्सेक्स पुन्हा 58 हजार पार करून 58,461.29 वर बंद झाला होता. तर NSEचा निफ्टी 234.75 अंकांच्या किंवा 1.37 टक्क्यांच्या वाढीसह 17,401.65 वर बंद झाला होता.

Share Market Crashed Amid Fear Of Omicron, Sensex Fall by 764 Points Nifty Below 17200

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात