नाशिक : Sharad pawar विधानसभा निवडणुकीमध्ये आपले नातू युगेंद्र पवार यांचा बारामतीत प्रचार करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रखर हल्लाबोल केला. त्यामध्ये त्यांनी एकाच राज्याचा विकास करायचा असेल, तर नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पद सोडून गुजरातचे मुख्यमंत्री व्हावे. आपली काही हरकत नाही, असे धक्कादायक वक्तव्य केले. यासाठी त्यांनी महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पळविल्याचा उल्लेख केला.Sharad pawar
शरद पवारांनी उच्चारलेल्या शब्दांच्या मराठी माध्यमांनी ताबडतोब वेदवाक्यप्रमाणे बातम्या केल्या. पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पहिल्याच सभेत कसे घेरले, त्यांना कसे सुनावले, वगैरे रसभरीत वर्णने मराठी माध्यमांनी केली.
पण हे सगळे करताना मराठी माध्यमांनी पवारांना जो मूळ प्रश्न विचारायला हवा होता, तो प्रश्न विचारला नाही, तो म्हणजे जर मोदींनी गुजरातचा विकास केला, म्हणून पंतप्रधान पद सोडून गुजरातचे मुख्यमंत्री व्हायचे असेल, तर मग शरद पवारांनी स्वतः नेमके कोणते पद स्वीकारले पाहिजे?? पण पवार बुद्धीच्या मराठी माध्यमांनी हा प्रश्न विचारणे शक्य नव्हते, आणि तसा तो त्यांनी विचारलाही नाही. पण म्हणून वस्तुस्थिती बदलत नाही.
नेता महाराष्ट्राचा, विकास बारामतीचा
गुजरातचा विकास या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींवर प्रादेशिकतेचा आरोप पवारांना करायचा असेल, तर लोकशाहीच्या अधिकारानुसार तो मान्य करावा लागेल, पण मग जे शरद पवार कधीकाळी देशाचे संरक्षणमंत्री, कृषिमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, ते पवार आपल्याकडे आलेल्या देशातल्या किंवा पदेशातल्या पाहुण्यांना संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाचे मॉडेल दाखवायला कायम फक्त बारामतीलाच नेत होते. बारामतीचा विकास दाखवून देशी आणि परदेशी पाहुण्यांकडून आपले कौतुक करवून घेत होते. मग पवारांनी देशाचे कृषिमंत्री पद किंवा संरक्षणमंत्री पद किंवा महाराष्ट्र मुख्यमंत्रीपद कशासाठी भूषवले होते??, जर पवारांना फक्त बारामतीचाच विकास करायचा होता, तर त्यांनी देशाचे संरक्षणमंत्री पद, कृषिमंत्री पद किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद सोडून बारामतीचे कायमचे पदसिद्ध नगराध्यक्षच व्हायचे होते. त्यापलीकडचे कोणते पद पवारांनीही स्वीकारण्याचे कारण नव्हते!!
कारण पवार हे त्यांच्या समर्थकांच्या मताप्रमाणे जरी फुले शाहू आंबेडकरांचे वारसदार असतील, तरी त्यांनी विकास फक्त बारामतीचाच केला, हे खुद्द त्यांनी त्यांच्या राजकीय कृतीतूनच अनेकदा सिद्ध केले. त्यामुळे मोदींवर जर गुजराती प्रादेशिकतेचा शिक्का मारायचा असेल, तर लोकशाहीतला अधिकार म्हणून तो मान्य करावा लागेल, पण मग पवारांवर महाराष्ट्राच्या संपूर्ण प्रादेशिकतेचाही शिक्का बसत नाही. जो शिक्का बसतो, तो फक्त बारामतीच्या विकास पुरुषाचा बसतो. मग तेवढाच शिक्का पवारांना चालणार आहे का?? पवारांच्याच निकषानुसार मोदींना गुजरातचे “विकास वीर” म्हणायचे असेल, तर पवारांना फक्त बारामतीचे “विकास वीर” म्हणावे लागेल. त्यापलीकडे काही म्हणता येणार नाही. मग पवारांना, त्यांच्या कन्येला आणि त्यांच्या नातवंडांनाही चालणार आहे का??
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App